Unlock Akola:corona update: कोविड निर्बंध; हॉटेल्स रेस्टॉरंट्स, दुकानांसाठी नियमावली जारी: कोरोना अलर्ट: उद्याचे लसीकरण कार्यक्रम

                                       file image



अकोला, दि.२३:  कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लावण्यात आलेले लेव्हल तीन च्या सुचनांप्रमाणे असलेले निर्बंध टप्प्या टप्प्याने शिथिल करण्यात  येत आहेत. त्याअनुषंगाने हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, खाद्यगृहे हे शुक्रवार दि.२२ च्या रात्रीपासून रात्री १२ वाजेपर्यंत तर दुकाने, शॉपिंग मॉल्स, प्रतिष्ठाने यांना रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केलेल्या आदेशान्वये देण्यात आली आहे.


आदेशात नमूद अटी व शर्ती याप्रमाणे-


१.      

सर्व प्रकारचे  दुकाने, प्रतिष्‍ठाने,  रेस्‍टॉरेन्‍ट , हॉटेल्‍स इत्‍यादी विविध आस्‍थापनामध्‍ये  काम करणाऱ्या  मालक, कामगार, कर्मचारी यांनी कोविड-१९ चा प्रादुर्भाव  व फैलाव होवू  नये  या करिता लसीकरण करुन घ्‍यावे. 


२.      

सुरु करण्‍यात आलेल्‍या आस्‍थापना यांनी  कोविड-१९ संदर्भातील केन्‍द्र शासनाच्‍या व राज्‍य शासनाच्‍या कोणत्‍याही निर्बंधाचा भंग होणार नाही याची खबरदारी घ्‍यावी.


३.      

निश्चित करण्‍यात आलेल्‍या  मार्गदर्शक तत्‍वांचा भंग झाल्‍याचे  निदर्शनास आल्‍यास संबंधितांविरुध्‍द नियमानुसार संबंधीत प्रशासकीय यंत्रणेकडून कारवाई करण्‍यात येईल.  


४.    

कोविड-१९ विषाणूंच्‍या  प्रादुर्भावास  प्रतिबंध करण्‍यासाठी शासनाने तसेच  या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेल्‍या आदेशातील बंधनकारक असणाऱ्या सूचना  लागू राहतील.                         


५.    

कोविड-१९ च्‍या व्‍यवस्‍थापनाबाबतचे  राष्‍ट्रीय निदेश  तसेच गृह कार्य मंत्रालय, आरोग्‍य व कुटूंब कल्‍याण  मंत्रालय, महाराष्‍ट्र शासन इत्‍यादींनी जारी केलेली संबंधित मार्गदर्शक तत्‍वे  यांचे सर्व कार्यामध्‍ये  व व्‍यवहारामध्‍ये कोटेकोरपणे  पालन करण्‍यात यावे, असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.




            *कोरोना अलर्ट*


*आज शनिवार दि.२३ ऑक्टोबर २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*

 

*प्राप्त अहवाल-२०८*

*पॉझिटीव्ह-एक*

*निगेटीव्ह-२०७* 


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य= एकूण पॉझिटीव्ह- एक


*अतिरिक्त माहिती* 


आज  दिवसभरात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एका पुरुषाचा समावेश असून  ते  मुर्तिजापूर येथील रहिवाशी आहे. 


दरम्यान आज  होम आयसोलेशन येथील दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


*आता सद्यस्थिती*


*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-४३२७५+१४४३०+१७७=५७८८२*

*मयत-११३९*

*डिस्चार्ज-५६७३१*

*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-१२* 


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त  माहितीनुसार) 


*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*


                      



                     ******

उद्या दिनांक 24/10/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.


1)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प (जेत्वन नगर)

2) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना

3)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी 

4)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

(सोनटक्के प्लॉट कल्याण वाडी)

5) GMC अकोला

6) IMA hall सिव्हिल लाईन चौक, अकोला 

7)नागरी आरोग्य केंद्र न्यू शिवाजी नगर शिवसेना वसाहत

मनपा शाळा

 8) सिंधी हिंदी शाळा क्रमांक 14 सिंधी कॅम्प पक्की खोली

9) ईक्रा प्रायमरी स्कूल हमजा प्लॉट


 18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covishield(*100 ऑनलाइन अपॉइंटमेंट  प्रथम डोस तथा  द्वितीय डोस) [ 200 कूपन   प्रथम डोस तथा द्वितीय डोस ]साठी

पद्धतीने सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.


1) लेडी हार्डिंग DHW


18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covexin (* 100ऑनलाइन अपॉइंटमेंट  प्रथम डोस तथा द्वितीय डोस) [  200कूपन  प्रथम तथा  द्वितीय डोस ]साठी

 सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.


ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी पासून सुरू राहील


अकोला महानगरपालिका अकोला.


टिप्पण्या