todays two trending news:India: आर्यन खान व अन्य दोघांना एक दिवसाची कोठडी: ममता बॅनर्जी यांचे मुख्यमंत्रिपद कायम




मुंबई : ड्रग्ज प्रकरणामध्ये बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एक दिवसाची कोठडी कोर्टाने सुनावली आहे. आज सायंकाळी आर्यन व अन्य दोघांना किला कोर्टात हजर केले होते. तिन्ही आरोपींना एका दिवसासाठी एनसीबीच्या कोठडीत राहवे लागणार आहे.


या दरम्यान त्यांची कसून चौकशी केली जाणार असून,पाळेमुळे शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या प्रकरणात मुख्य ड्रग्ज पेडलर कोण आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एनसीबीने आरोपींची कोठडी मागितली.



आठ जण ताब्यात; तिघांवर गुन्हे दाखल



शनिवारी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका जहाजात रेव्ह पार्टी सुरू असल्याच्या माहितीच्या आधारे  एनसीबीच्या अधिकाऱ्यानी कारवाई करत अंमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणात एकूण आठ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. तर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एनसीबीकडे आरोपींच्या विरुद्ध भक्कम पुरावे असल्याचे एन सी बी अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगत आरोपींची कस्टडी मागितली.



15 दिवसापासून तयारी


मुंबईत होणाऱ्या रेव्ह पार्टीची माहिती मिळाल्याने 15 दिवसांपासून NCB टीम  या ऑपरेशनची तयारी करीत असल्याचे समोर आले. शनिवारी सकाळीच 20 ते 22 अधिकाऱ्यांचे पथक सर्च वॉरंट घेऊन एनसीबी कार्यालयातून निघाले. सर्व अधिकारी साध्या वेशात होते, त्यामुळे ते कोणलाही शंका येणार नाही, असे पार्टीत सहभागी झाले होते. मात्र पार्टी सुरू होण्याआधीच एनसीबीला तपासात मोठे पुरावे सापडले. अधिकाऱ्यांनी पार्टीत सामील झालेल्या सर्वांना एका खोलीत नेले आणि तेथे त्यांची कसून झडती घेतली. यामध्ये आठ जणांना ताब्यात घेतले. त्यापैकी तिघांवर विरुद्ध भक्कम पुरावासह तक्रार दाखल करून NDPS Act section 27 अन्वये गुन्हे नोंदविले. अआर्यन सह मान्सून धामेचा, अरबाज मर्चंट यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रविवारी सायंकाळी तिघांना कोर्टासमोर हजर केले.



ममता बॅनर्जी: मुख्यमंत्रीपद आता कायम



पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून भारतीय जनता पार्टीला पराभूत करणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या विजय रथाची घौडदौड कायम राखत आज भवानी विधानसभा पोटनिवडणुकीत ५८ हजारापेक्षा अधिक मताची आघाडी घेत भाजपाच्या प्रियंका टिबरेवाल यांचा पराभव केला. 




या विजयामुळे ममता बॅनर्जी याचं मुख्यमंत्रीपद आता कायम राहणार आहे. अलिकडेच पार पडलेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल कॉंग्रेसनं भाजपाला धोबिपछाड देत २१३ जागांवर दणदणीत विजय मिळाला होता. मात्र नंदीग्राम मतदार संघात झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.


पश्चिम बंगालमधे विधानपरीषद नसल्यानं मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या ममता बॅनर्जी यांना सहा महीन्यात निवडणुक येणं आवश्यक होता. भारतीय निवडणुक आयोगानं घोषीत केलेल्या भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान पार पडले होते. 



टिप्पण्या