- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला: सद्गुरु संकटातून मुक्त करून सदाचाराचा मार्ग दाखवणारे असून त्यांच्या कृपेने अज्ञानी सुद्धा सर्व गुण संपन्न होऊन ईश्वर भक्ती सोबत समाजाला दिशादर्शक ठरू शकतो, असे प्रतिपादन भागवताचार्य विजय प्रकाश दायमा महाराज यांनी केले.
सद्गुरु आपल्या शिष्याची संकटातून मात करण्याची ताकत असून ईश्वराला सुद्धा सद्गुरु प्रिय असे असून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये सद्गुरु यांच्या शरण जाऊन जीवन यशस्वी करावे भगवत गीता भागवत व सर्व ग्रंथ वेद सद्गुरूची कृपा असल्याशिवाय वाचन मनन श्रवण होऊ शकत नाही चौधरी परिवाराने सद्गुरूची च्या कृपेने भागवताचे आयोजन करून आपल्या परिसरातील आपल्या परिवाराच्या कल्याणाच्या मार्ग सुकर केला असल्याचे आचार्य दायमा म्हणाले.
प्रत्येक ईश्वराचे अवतार प्रेरणादायी सोबत विशिष्ट उद्देश घेऊन मानव कल्याणासाठी अवतरीत झाले आहे. वेदव्यास यांनी सुखदेव ऋषीच्या मुखारविंदातून राजा परीक्षित यांचा कलियुग आरंभ प्रसंगी आपले सद्गुरु राधा राणी यांच्या प्रेरणेने ग्रंथ वर्णन केले आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने कर्माचा सिद्धांत सांगितला. सुखदेव मुनीने पूर्ण भागवत मध्ये आपल्या सद्गुरु राधा राणी च्या प्रेरणेने मानव कल्याण केला. श्रीकृष्णाने राधाला सांगितलेल्या कथा पोपटाने श्रवण केली. पोपट च्या रूपात सुखदेव मुनी यांनी भगवान श्रीकृष्णाच्या स्पर्शाने संपूर्ण की कथेला म्हणून समान करून मानव कल्याण आला समर्पित केले अशा कथेचा आनंद प्रत्येकाने घ्यावा आपल्या पूर्वजांचा कल्याण करावा पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त करावा गुरूचा आशीर्वाद प्राप्त करावा. गुरूंच्या आशीर्वादाने प्रत्येकाचा जीवन धन्य होऊ शकतो असे अनेक उदाहरण आहे. सद्गुरु ची सेवा त्यांचे वचन अंगीकार करावे अशीही भागवताचार्य दायमा महाराज यांनी सांगितले.
मानवता तसेच संकटात सापडलेल्या प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहून समर्थ असणाऱ्या नागरिकांनी मदत करावी. सनातन धर्माची शिकवण आहे, असे यावेळी दायमा महाराजांनी सांगून ईश्वर कथाचे महत्व विशद केले.
दायमा महाराज यांचे स्वागत चौधरी परिवाराने केले. यावेळी अनिल मानधने यांनी प्रास्ताविक करून ज्योतिषाचार्य भागवताचार्य विजय प्रकाश दायमा महाराज विदर्भातील 600 पेक्षा जास्त भागवत कथा करणारे संत असल्याचा सार्थक अभिमान असून अनेक परिवाराच्या कल्याणासाठी सातत्याने कार्य दायमा महाराज यांच्या कार्याचा गौरव केला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा