Spirituality:Bhagwat Story:Akola: भगवान श्रीकृष्ण चरित्रातून अन्याया विरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते- दायमा महाराज

Spirituality: Bhagwat Story: The character of Lord Krishna inspires us to fight against injustice - Dayama Maharaj






नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवन चरित्रातून कर्म प्रधान सोबत अन्याया विरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते.   तसेच वेळप्रसंगी तडजोड स्वीकारून कार्य करण्याची शिकवण प्राप्त होते, असे प्रतिपादन भागवताचार्य विजय प्रकाश दायमा यांनी केले. चौधरी परिवार आयोजित भागवत कथा कार्यक्रमात ते बोलत होते. 



पुढे महाराजांनी नरसिंह भगवानाचे चरित्र विशद करून नरसिंह अवतारात श्री विष्णूंनी अन्याय सोबत भक्तांच्या पाठीशी उभे राहण्याची शिकवण दिली असल्याचे सांगितले. 



भागवत कथा ही जीवनातील सार असून प्रत्येकाने भगवंत भक्ती सोबत पीडित वंचितांना आधार व मदत करून मानवधर्माचा पालन करावे. प्रत्येकाच्या भावनांचा आदर सत्कार करावा. प्रेम विश्वास भेदभाव न करता कार्य करावे, असे देखील भागवताचार्य दायमा यांनी याप्रसंगी सांगितले.



कथा श्रवण व मनन करून जीवनामध्ये प्रत्येकाच्या संकटांमध्ये पाठीशी उभे राहून चांगले काम करणे करणे हेच ईश्वर भक्ती असल्याचे सांगून भागवत कथेत याचे वर्णन असल्याचेही यावेळी दायमा महाराजांनी सांगितले. 




यावेळी दायमा महाराजांनी ईश्वर कथा श्रवण करणारे किती यापेक्षा मनन करून जीवनामध्ये आचरणात आणणारे किती याला महत्त्व असते. त्यामुळे भागवताचार्य आपल्या कर्तव्याचे पालन करून मानव कल्याणाची संकल्पना घेऊन इश्‍वराच्या विशेष कृपादृष्टी मुळे ही कथा पठण करण्याचे स्वभाग्य लाभले याचा मला सार्थ अभिमान आहे, असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 



यावेळी जीवाराम चौधरी, परखाराम चौधरी, हिंमत चौधरी, हरी चौधरी यांनी पूजा-अर्चना केली.

टिप्पण्या