Shakuntala Railway Satyagraha: दर्यापूर येथून 'शकुंतला रेल्वे' सत्त्याग्रहाचा प्रारंभ; जनजागरण सप्ताहांतर्गत सर्व गावांमध्ये पदयात्रा व स्थानकाची स्वच्छता मोहीम राबविणार

Commencement of 'Shakuntala Railway' Satyagraha from Daryapur;  During the Janajagaran week, a clean-up drive will be carried out in all the villages





दर्यापूर दि. 2 : 'शकुंतला बचाव सत्याग्रही' ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजय विल्हेकर यांनी रणशींग फुंकल्याने क्लीक निक्सन या ब्रिटीश कंपनीच्या गूलामगिरीतून अलीकडेच 'शकुंतला' रेल्वे गाडी मुक्त झाली. मात्र, 'शकुंतला' गाडीचा येथेच  'वनवास' संपला नाही. ग्रामीण वनवासी भागात 'लेकुरवाळी' 'जीवन वाहिनी' समजल्या जाणारी शकुंतला रेल्वे बचाव साठी गांधीवादीनी सत्याग्रह सुरू केला. सत्त्याग्रहातील तिसऱ्या टप्यात दर्यापूरला महात्मा गांधींना नमन करून,सत्त्याग्रहाचा प्रारंभ केला. तर दुपारी मूर्तिजापूर येथे 'शकुंतला' 'च्या रुळावर स्वच्छता अभियान राबवून पदयात्रा काढण्यात आली.



'शकुंतला रेल्वे बचाव'  सत्याग्रहींच्या वतीने मूर्तिजापूर शहरात शकुंतला रेल्वेच्या टाऊन स्टेशन वरील झुडपांनी व्यापलेल्या रुळावर स्वच्छता आभियान राबविण्यात आले. 'शकुंतला रेल्वे सुरु झालीच पाहिजे', 'जनसामान्यांची जीवनवाहिनी शकुंतला रेल्वे', अशा घोषणांच्या निनादात रेल्वे रुळावर सामाजिक कार्यकर्ते विजय विल्हेकर यांच्या नेतृत्वात शकुंतलेच्या प्रतिकात्मक इंजिनसह पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर मुख्यरस्त्यावारून जनजागरणाच्या उद्देशाने प्रतिकात्मक इंजिनसह मोटारसायकल रॕली काढण्यात आली. या जनजागरण रॕलीचा समारोप स्टेशन विभागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ झाला.




शकुंतलाताई देशमुख (ज्यांच्या पाठपुराव्यामुळे या रेल्वे गाडीचे 'शकुंतला' नामकरण झाले) यांचे सुपुत्र माधव देशमुख, मूर्तिजापुरातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बोनगिरे, प्रा.सुधाकर गौरखेडे, पत्रकार अविनाश बेलाडकर, विलास नसले, संजय उमक, अजय प्रभे, बाळासाहेब गणोरकर, माधवराव काळे, प्रविण कासारकर, सेवकराम लहाने, समाधान इंगळे, पालनदास घोडेस्वार, सुमित सोनोने, मिलीद जामनिक, पंकज जामनिक, संजय किडे, प्रहारसेवक संतोष इंगोले, विलास वानखडे, मनोज रेखे, विजय लाजूरकर आदी सत्याग्रही या पदयात्रेत सहभागी झाले.




"शकुंतला रेल्वे- ही रेल्वे निर्मितीतील पहिली रेल्वे आहे. ती तीन वर्षांपूर्वी पर्यंत सुरळीत सुरू होती, पण काही क्षुल्लक  कारण समोर करून ही रेल्वे कायमस्वरूपी  बंद करण्यात आली. ब्रॉड  गेजचे  कारण  समोर करून मूळ रेल्वे गाडी बंद करणे योग्य नाही. जेव्हा ब्रॉड गेजचे कार्य सुरू होईल, तेंव्हा शकुंतला साहित्य वाहून आणण्यात महत्वाची कामगिरी बजावणार आहे. 'शकुंतला' मेळघाटच्या निसर्गरम्य सातपुड्यातील आदिवासी, शेतकरी, कामकरी प्रवाशांना मध्य रेल्वेच्या मूळ प्रवाहात घेऊन जाणारी आहे. यवतमाळ पासूनचा नागवळणी शकुंतला प्रवास. पर्यटकांना दार्जिलिंग, ऊटी, निरूल -माथेरान,   सिमला प्रमाणे. प्रवासाचा  आनंद देईल. म्हणून शकुंतला रेल्वे हेरिटेज, पर्यटक तत्वावर सुरू करावी. सध्या आहे त्या स्थितीत थोडी बहुत सुधारणा  करून अत्यल्प खर्चात सुरू करावी."

-विजय विल्हेकर, 

शकुंतला बचाव सत्याग्रही दर्यापूर.




या मागणी संदर्भातील निवेदन संबंधित रेल्वे विभागाला दिली आहेत. 'शकुंतला रेल्वे जनजागरण सत्त्याग्रह'  सुरू झाला असून,  त्यात  शकुंतला रेल्वेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी शकुंतला रेल्वे सुरळीत सुरू  होईपर्यंत शकुंतला रेल्वेसाठी मोफत सेवा देण्याचे मान्य करून, शकुंतला सत्त्याग्रहाला बळ दिले आहे. 




शकुंतला रेल्वे बचावच्या आवाहनाला प्रतिसाद देत अंजनगावचे नगराध्यक्ष ऍड. कमलकांत लाडोळे, मूर्तिजापूर नगराध्यक्ष मोनाली गावंडे व दर्यापूर नगराध्यक्ष  नलिनी भारसाकळे यांनी ठराव करण्याचे मान्य केले. तसेच ग्रामपंचायतींनी ठराव देण्याचे मान्य केले. अनेक संस्था, संघटना, व्यक्ती, पक्ष कार्यकर्ते यांनी निवेदन व प्रत्यक्ष भेट घेऊन शकुंतला रेल्वे सुरु करण्या संदर्भातील मनोदय केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी  व रेल्वे राज्यमंत्री  रावसाहेब दानवे यांच्या समक्ष व्यक्त केला असल्याचे सत्याग्रहींनी सांगितले. 


टिप्पण्या