Electricity bill payment centers: अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील वीजबिल भरणा केंद्र शनिवारी, रविवारी सुरु राहणार

Electricity bill payment centers in Akola, Buldhana, Washim districts will be open on Saturdays and Sundays (file image)




अकोला,दि.२९: चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी  अकोला परिमंडळात येणाऱ्या अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि.३०) व रविवारी (दि.३१) ऑक्टोबर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे.




महावितरणकडून देण्यात आलेल्या महितीनुसार, अकोला जिल्ह्यात  महावितरणचे उपविभागीय स्तरावर बाळापूर, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर, पातूर, अकोट, तेल्हारा,अकोला या ठिकाणी १० वीज बिल भरणा केंद्र सुरु आहेत. सोबतच जिल्ह्यातील ३२ सहकारी पत  संस्थेतही वीज देयक भरण्याची सुविधा आहे. जिल्हयात गाव पातळीवर वीज देयकाची भरणा करण्यासाठी ७६ ठिकाणी ‘महा पॉवर पे’ ची सुविधा आहे. बुलढाणा जिल्ह्यात महावितरणची केणू २९४ बिल भरणा केंद्र  सुरु राहणार आहेत. यात बुलढाणा, मेहकर, मोताळा, सिंदखेडराजा, लोणार,शेगावसह एकूण १५ उपविभागीय केंद्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ६२ तर  ११९ वॅलेट वीज ग्राहकांच्या सोयीसाठी सुरु राहतील.




वाशीम जिल्ह्यातील वीज ग्राहकांसाठी ४६ वीज बिल केंद्र  या काळात सुरु राहणार आहेत.



सोबतच वीज ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरण कडून ऑनलाईन वीज देयकाची भरणा करण्याची सुविधा दिली आहे. महावितरण ‘मोबाईल अँप’ चा वापर करून वीज ग्राहक आपल्या देयकाची रक्कम भरू शकतात. 



लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट, मोबाईल अँप  किंवा इतर 'ऑनलाईन' पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे. थकबाकीदार वीज वीज ग्राहकांनी थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करून  सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या