edible oil prices fall in India: भारतात मोहरीचे तेल वगळता देशांतर्गत किरकोळ आणि घाऊक खाद्य तेलाच्या किमतीत घट; सणासुदीच्या काळात सामान्य नागरिकांना दिलासा देणारी बाब

Domestic retail and wholesale edible oil prices fall in India, excluding mustard oil (file photo)





ठळक मुद्दे

आंतरराष्ट्रीय बाजारात, खाद्य तेलाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे, देशांतर्गत बाजारातही चढउतार


गव्हाच्या किरकोळ आणि घाऊक दरात, गेल्या वर्षभरात अनुक्रमे 7.12 टक्के आणि 4.37 टक्क्यांची घट


मे महिन्याच्या तुलनेत, चणा, तूर, उडीद आणि मुगाच्या किमतीतही घसरण


कांदा, बटाटा आणि टमाटोच्या किंमतीतही वर्षभरात घसरण


 


नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असतांना, देशांतर्गत, बाजारात मात्र, काही तेल वगळता, खाद्यतेलांच्या किमती कमी होतांना दिसत आहेत, अशी माहिती, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिली आहे. सणासुदीचा काळ असल्याने खाद्य तेलाच्या किमती कमी होणे ही मात्र सामान्य नागरिकांना दिलासा देणारी बाब आहे.





आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलांच्या किमतीत लक्षणीय म्हणजे, 1.95% ते 7.17% वाढ झाली आहे, मात्र सरकारने या तेलावरील आयात शुल्क कमी केल्यानंतर देशांतल्या बाजारात मात्र, खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. हे शुल्क कमी केल्यानंतर किमतीत झालेला परिणाम लक्षणीय आहे. (3.26% ते 8.58% पर्यंत घट). केंद्र सरकारने हे शुल्क कमी करण्यासाठी केलेल्या विविध प्रयत्नांचा ग्राहकांना लाभ मिळणार आहे. 




सोयाबीन तेल, सनफ्लॉवर तेल, कच्चे पाम तेल, आरबीडी पामोलीव्ह तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीत, गेल्या महिनाभरात अनुक्रमे, 1.85%, 3.15%, 8.44% आणि 10.92% इतकी वाढ झाली आहे. मात्र या तेलांवरील आयात शुल्क, 11 सप्टेंबर 2021 पासून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे, देशांतर्गत बाजारात, तेलाच्या किमती 0.22% ते 1.93% पर्यंत कमी झाल्या आहेत. मात्र, मोहरीचे तेल जे भारतातच तयार होणारे तेल असून, केंद्र सरकार करत असलेल्या विविध प्रयत्नांमुळे या किंमतीही लवकरच कमी होण्याची अपेक्षा आहे.




त्याचप्रमाणे, घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही बाजारात, गव्हाच्या किमती, अनुक्रमे 5.39% आणि 3.56% कमी झाल्या आहेत. तांदळाच्या घाऊक किमतीत 0.07% ची घट आणि किरकोळ किमतीत 1.26% ची वाढ झाली आहे.




गव्हाच्या दरात वार्षिक तुलनेत, घाऊक किमतीत, 7.12% तर किरकोळ बाजारात 4.37% घट झाली आहे.




तांदूळ आणि गव्हाच्या किमान हमीभावात वाढ झाली असली तरीही, (तांदूळ - 1868/क्विंटल वरुन, 1940 आणि गहू - 1925/क्विंटल वरुन, 1975 पर्यंत)  बाजारात, गहू आणि तांदळाच्या दरात घट झाली असून, सर्वसामान्य ग्राहकांसाठी ही घट दिलासादायक आहे.




मे महिन्याच्या तुलनेत, ऑक्टोबरमध्ये, चणा, तूर, उडीद आणि मूगाच्या किमती, अनुक्रमे 1.08%, 2.65%, 2.83% आणि 4.99% ने घटल्या आहेत.




कांदा, बटाटा, टमाटो किमतीतही  घट 

                                      file image


कांदा, बटाटा, टमाटो यांच्या अखिल भारतीय किरकोळ किमतीतही वार्षिक तुलनेत, घट झाली आहे. बटाटा, 44.77%  कांदा 17.09% टक्के आणि टमाटोच्या किमती वार्षिक तुलनेत 22.83% नी घटल्या असल्याची माहीती अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिली आहे.







टिप्पण्या