Diwali celebrations 2021:Akola: दीपावली उत्सव-2021; गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी;काय आहेत नियम आणि अटी जाणून घ्या

Diwali celebrations-2021;  Home Department Guidelines issued; Learn what the terms and conditions are (file image)



अकोला,दि.28: गृह विभागाने दिपावली उत्सव-2021 बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दिपावली उत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.




दि. 2 ते  6 नोव्हेंबर 2021 दरम्यान दिपावली उत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी, अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करून उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. दिपावली उत्सव साजरा करताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेवून मार्गदर्शक सूचनाचे पालन करा.




मार्गदर्शक सूचना :

                                      file image


           

कोवीड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने "ब्रेक द चेन" अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांचे तंतोतंत पालन करावे. 


कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यात आलेली असली तरीही दिपावली उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादीत राहील याची दक्षता घेण्यात यावी. 


दिपावली उत्सवा दरम्यान कपडे, फटाके, दागदागिने व इतर वस्तु खरेदी करण्यासाठी दुकानात व रस्त्यांवर गर्दी होत असते. तथापि, नागरिकांनी शक्यतोवर गर्दी टाळावी. 


विशेष करून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे टाळावे. तसेच मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही.


            


दिपावली हा दिव्यांचा तसेच प्रकाशाचा उत्सव मानला जातो. या उत्सवा दरम्यान दरवर्षी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. त्यामुळे वायु व ध्वनी प्रदुषणाची पातळी वाढून जनसामान्यांच्या तसेच प्राणीमात्रांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम दिपावली उत्सवानंतर बराच कालावधीपर्यंत दिसून येतात. 


कोरोना आजार झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे वायू प्रदुषणाचा त्रास होण्याची भिती आहे. ही बाब विचारात घेऊन नागरिकांनी यावर्षी फटाके फोडण्याचे टाळावे. त्याऐवजी दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा.


            

सार्वजनिक आरोग्य विभागाव्दारे ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सुचनांनुसार कोरोनाचे नियम शिथील करण्यात आले असले तरी देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येण्यावर निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम उदा. दिपावली पहाट आयोजित करतांना मार्गदर्शक सूचनांमधील नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी.


शक्यतोवर अशा कार्यक्रमांचे ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे प्रसारण करण्यावर भर देण्यात यावा. 


सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राध्यान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरीया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी. मात्र त्या ठिकाणी देखील लोकांनी एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊ नये, यावी दक्षता घेण्यात यावी. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.


कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधीत महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्या प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक आहे.


टिप्पण्या