Crime:bribe:Caste Verification: जात पडताळणी समितीच्या संशोधक सहाय्यकाला लाच स्वीकारताना रंगेहात अटक;आज न्यायालयात हजर करणार

Researcher of Caste Verification Committee arrested for accepting bribe (file image)






नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय येथे संशोधक सहाय्यक पदावर कार्यरत अनिल कचुरुआप्पा दयाळ याला लाच स्विकारतांना अटक करण्यात आली आहे. या विभागात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंध विभागाला प्राप्त झाली होती. तक्रारदार व त्यांची पत्नी यांचे जात पडताळणीचे प्रकरण त्रुटी मध्ये न काढता लवकर पडताळणी करून देण्याकरिता 6,000/-  रुपयाची मागणी करण्यात आली होती. जी तडजोडी अंती 5,000/- रुपये झाली. आरोपीला सापळा रचून पाच हजाराची लाच स्वीकारतांना शुक्रवारी रंगेहात पकडण्यात आले आहे. आरोपीला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.






या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार (दिग्रस खुर्द, ता. पातुर) व त्यांची पत्नी यांचे जात पडताळणी चे प्रकरण त्रुटी मध्ये न काढता लवकर पडताळणी करून देण्याकरिता अनिल कचुरुआप्पा दयाळ (वय-25 वर्षे  संशोधक सहाय्यक (कंत्राटी) जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय अकोला.) याने 6,000/-  रुपयाची मागणी करून तडजोडी अंती 5,000/- रुपये लाच स्वीकारली. जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय अकोला येथेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपी दयाळ याला रंगेहात पकडले. आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

       



 

ही कारवाई विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती, अरूण सावंत, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती, पोलीस उप अधीक्षक उत्तम नामवाडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पथक नरेश रणधीर पोलीस निरीक्षक ला.प्र.वि.अकोला, पो.अंम अरुण इंगोले. राहुल इंगळे, प्रदीप गावंडे, निलेश शेगोकार (सर्व ला.प्र.वि.अकोला) यांनी केली.




टिप्पण्या