Akola zp pc by election: ओबीसी अतिरिक्त राजकीय आरक्षण मुद्दा: अकोल्यात लाखपूरीची जागा वगळता सर्वच १३ ठिकाणी ओबीसी उमेदवारांनीचं मारली बाजी

Akola zp pc by election: OBC candidates win in all 13 constituencies except Lakhpuri in Akola




ॲड. नीलिमा शिंगणे जगड

अकोला : अकोल्यात जिल्हा परिषदेच्या १४ तर पंचायत समितीच्या २८ जागांसाठी पोट निवडणूक झाली. ओबीसी सदस्यांची जागा रिक्त झाल्याने जवळपास सर्वच पक्षांनी पुन्हा ओबीसी उमेदवारांनाचं संधी दिली. खुल्या वर्गातून ही निवडणूक लढूनही अकोला जिल्ह्यातील लाखपूरीची जागा वगळता सर्वच १३ ठिकाणी ओबीसी उमेदवारांनी बाजी मारली असल्याचे बुधवारी जाहीर झालेल्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. 




जिल्ह्यातील लाखपूरी सर्कल मधून मागासवर्गीय प्रवर्गातून अपक्ष उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांनी विजय मिळविला. मात्र ओबीसींच्या अतिरिक्त राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या अकोल्यातील या निवडणुकीत खुल्या वर्गातून पुन्हा १४ पैकी १३ ओबीसी उमेदवारांनी यश मिळविले असल्याने या मुद्याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष गेले आहे. तर राजकीय नेत्यांवर आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे. 





राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये ओबीसीसाठी असलेल्या २७ टक्के आरक्षणानुसारच निवडणुक घेण्याचे सर्वोच्च न्यायायलने ४ मार्चला आदेश दिले होते. यानुसार नागपूर, अकोला, वाशिम, नंदूरबार व धुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमधील ओबीसी वर्गातील जागा कमी करण्यात आल्या आणि पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती.




सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील पाच जिल्ह्यातील जि. प आणि पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये दिले जाणारे जाती निहाय आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा अधिक होत असल्याने घटनेतील मर्यादेच्या म्हणजे २७ टक्के तरतुदीतच ते द्यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.






टिप्पण्या