Akola newsletter: सिंधी कॅम्प जवळील खदानीमध्ये वृद्ध महिलेचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला: इतर वृत्त वाचा

        घटनास्थळी खदान पोलीस




अकोला सिंधी कॅप जवळील खदान मधील वृध्द महीलेचा मृतदेह संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने बाहेर काढला.



अकोला: येथील सिंधी कॅप्म जवळील वाठुरकर खदान मध्ये एका महीलेचा मृतदेह असल्याची माहीती खदान पो.स्टे.चे ठाणेदार श्रीरंग सनस यांनी मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ येण्याचे सांगितले. यावेळी जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी लगेच पथकाचे स्वयंसेवक अंकुश सदाफळे,मयुर सळेदार यांना शोध व बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी पाठविले असता, मृतदेह हा मध्यभागी असल्याने तसेच खदान मध्ये सांडपाणी असल्याने अतिशय दुर्गंधी येत होती. अश्या स्थितीतही पथकातील सदस्यांनी रेस्क्यु बोट टाकुन अर्ध्या तासात महीलेचा मृतदेह बाहेर काढला.



यावेळी खदान पो.स्टे.चे ठाणेदार श्रीरंग सनस ,पो.हे.काॅ.डी.पी. सुरडकर, पो.काॅ.अविनाश राठोड, पो.काॅ. निलेश खंडारे,म.पो.यशोदा पैठणकर व नातेवाईक उपस्थित होते,अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे .



                       ******

महाविकास आघाडीचा बंद म्हणजे अपयश लपविण्याचा प्रकार-विजय अग्रवाल


अकोला: शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांचे 11 ऑक्टोंबर रोजी बंद म्हणजे आपले अपयश लपविण्याचा प्रकार असून सर्व क्षेत्रात महाविकास आघाडी अपयशी ठरल्यामुळे जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केला आहे.




एकीकडे जम्मू-काश्मीरमध्ये जात विचारून शिक्षक सहीत सात लोकांची हत्या झाली. परंतु याविषयी एकही शब्द शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी काढत नाही. छत्तीसगड मधील घटनेविषयी एकही शब्द शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी बोलत नाही.विदर्भाचा शेतकरी संकटात आहे त्याला मदत देत नाही. विकास निधी देत नाही. अकोला जिल्हा रुग्णालय येथे व्यवस्था नाही अकोला सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सुविधा युक्त भाजपा सरकारने उभे केल्यानंतर सुद्धा सुरू करण्यात येत नाही याविषयी एकही शब्द आघाडीचा नेता लोक प्रतिनिधी बोलत नाही.      



covid-19 च्या काळात संपूर्ण व्यवहार ठप्प होते. व्यापाऱ्यांना कोणतीही सवलत नाही. विज 100 युनिट मोफत देऊ अशी घोषणा करण्यात आली परंतु त्याची अंमलबजावणी नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 50 हजार रुपये देऊ, अशी घोषणा शरद पवारांपासून तर उद्धव ठाकरे यांनी केली. परंतु मदत नाही नियमित कर्ज कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही अजून शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली नाही याविषयी महाविकास आघाडी एक शब्द उच्चार करत नाही यावरून शेतकऱ्या विषयी व सर्व सामान्य नागरिकांशी यांची तळमळ लक्षात येते. 



सर्वसामान्य नागरिक तसेच धम्मचक्र दिवस दसरा ईद सारखे  सणवार असताना नागरिकांना खरेदीसाठी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बंद पुकारून सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय करण्याचा हा प्रकार असून पण व्यापाऱ्यांनी सहभाग न होता . नागरिकांना सुविधा द्यावी व पोलीस प्रशासनाने व्यापारी व नागरिकांना संरक्षण द्यावे अशी मागणी व अराजकता निर्माण होणार नाही याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी  भाजपा  अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केली आहे.




                      ******

कोरोना अलर्ट:  दोन पॉझिटिव्ह, एका रुग्णाचा मृत्यू


आज शनिवार दि.९ ऑक्टोबर २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार, 


*प्राप्त अहवाल-१९९*

*पॉझिटीव्ह-दोन*

*निगेटीव्ह-१९७* 


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर दोन+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य= एकूण पॉझिटीव्ह- दोन


*अतिरिक्त माहिती* 


आज  दिवसभरात दोन जणांचा  अहवाल पॉझिटिव्ह आला असून  दोन्ही महिला असून अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहे.


आज एका महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेस उपचारासाठी दि.२ रोजी दाखल करण्यात आले होते.


*आता सद्यस्थिती*


*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-४३२६४+१४४२९+१७७=५७८७०*

*मयत-११३८*

*डिस्चार्ज-५६७१६*

*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-१६* 


(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त  माहितीनुसार) 


*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*



                      ******

उद्या दिनांक 10/10/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.



1)नागरी आरोग्य केंद्र खदान आदर्श कॉलनी 16 नंबर शाळा नागरी 

2)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी 

3)   मनपा शाळा क्रमांक 3 व 4 (टेम्पल गार्डन शाळा)

 प्रांगणात

रामदासपेठ पोलिस स्टेशनच्या बाजूला 

4) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

5) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना

6)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी 

7)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

8) GMC अकोला

9) IMA hall सिव्हिल लाईन चौक, अकोला 

10) नागरी आरोग्य केंद्र न्यु शिवाजी नगर शिवसेना वसाहत मनपा शाळा

11)डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह जेतवन नगर

12) आर के टी आयुर्वेदिक कॉलेज जठारपेठ 


 18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covishield(*100 ऑनलाइन अपॉइंटमेंट  प्रथम डोस तथा  द्वितीय डोस) [ 200 कूपन   प्रथम डोस तथा द्वितीय डोस ]साठी

पद्धतीने सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.



1)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड

2) लेडी हार्डिंग DHW

3)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर

मनपा शाळा क्रमांक 22 


18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covaxin (* 100ऑनलाइन अपॉइंटमेंट  प्रथम डोस तथा द्वितीय डोस) [  200कूपन  प्रथम तथा  द्वितीय डोस ]साठी

 सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.



ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील


*अकोला महानगरपालिका अकोला.




                      ******

बहुजन समाज पार्टी सोशल मीडिया डिजिटल सदस्य नोंदणी ॲपचे उद्घाटन



अकोला: बहुजन समाज पार्टी च्या वतीने आज अकोला येथे 9 ऑक्टोंबर कांशीराम यांच्या स्मृतिदिनानिमित्त अशोक वाटिका येथे बहुजन समाज पार्टी सोशल मीडिया डिजिटल सदस्य नोंदणी ॲपचे उद्घाटन करण्यात आले.



बहुजन समाज पार्टीचे डिजिटल अभियान 9 ऑक्टोंबर 2021 ते 9 नोव्हेंबर 2021 बहुजन समाज पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान जिल्ह्यामध्ये राबविल्या जाणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बहुजन समाज पार्टीची जिल्हा प्रभारी डॉक्टर धनंजय नालट होते. प्रमुख अतिथी जिल्हाध्यक्ष  विजय येलकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश इंगळे, विजय गणवीर हे होते. 



या कार्यक्रमात 9 ऑक्टोंबर हा  कांशीराम स्मृतिदिन समाजासाठी दिन दलितांसाठी केलेल्या कार्याचा विचार विचार मंथन भाषणे झाली. या कार्यक्रमाला संघपाल शिरसाट, राहुल झाडोकार, राहुल शिरसाट ,विशाल इंगळे आदी सर्व पदाधिकारी हजर होते.




                      ******

चंद्रपूर मधील घटनेचा मुख्यध्यापक संघाकडून निषेध


विदर्भ मुख्याध्यापक संघटने कडून चंद्रपूर येथील मुख्याध्यापकवर झालेला प्राणघातक हल्ला च्या निषेधार्थ अकोला जिल्हा व विदर्भ संघटनेचे सर्व पदाधिकारी अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांना निवेदन दिले. मारेकर्‍यांना त्वरित कारवाई करून अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.


याप्रसंगी महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजीत पाटील, अमरावती विभागीय शिक्षक आमदार एडवोकेट किरण सरनाईक, विदर्भ मुख्याध्यापक संघ अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर, सचिव सतीश जगताप, कार्याध्यक्ष अशोक पारधी, उपाध्यक्ष विलास भारसाकडे, सहसचिव मंगेश धानोरकर, सहसचिव गजेंद्र काळे, अकोला जिल्हा अध्यक्ष बळीराम झांबरे, सचिव दिनेश तायडे, यवतमाळ अध्यक्ष प्रकाश काळे, अमरावती कार्याध्यक्ष अशोक चोपडे, वाशिम अध्यक्ष विनोद पाटील, अकोला जिल्हा महानगर अध्यक्ष सरफराज खान, सचिव डॉक्टर प्रकाश नवले, जिल्हा कार्याध्यक्ष विजय ठोकळ, कोषाध्यक्ष माधव विखे, सहसचिव कल्पना धोत्रे, संघटक सहसचिव दिनकर गायकवाड, संचालक रमेश चव्हाण, विलास खूमकर, जिल्हा सचिव दिनेश तायडे आदी उपस्थित होते.




टिप्पण्या