Akola news letter:Corona update: मनपा क्षेत्रातील दोन पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह व इतर बातम्या





 




अकोला,दि.3: आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 200 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 198  अहवाल निगेटीव्ह तर दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.


त्याच प्रमाणे काल (दि.2) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57862(43256+14429+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर दोन + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह दोन


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 323232 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 319608 फेरतपासणीचे 402  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3222 नमुने होते. आजपर्यंत एकूण 323208 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 279952 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


दोन पॉझिटिव्ह


आज  दिवसभरात दोन महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून त्या अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहे. दरम्यान रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, याची नोंद घ्यावी.


15 जणांवर उपचार सुरु


जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57862(43256+14429+177) आहे. त्यात 1137 मृत झाले आहेत. तर 56710 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 15 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.


रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 122 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह


 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.2) दिवसभरात झालेल्या 122 चाचण्या झाल्या त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.


काल दिवसभरात मुर्तिजापूर येथे तीन, अकोला महानगरपालिका येथे 82, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 25, हेगडेवार लॅब येथे 12 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 122 जणांच्या चाचण्या होऊन त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला.




उद्या दिनांक 04/10/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.




1)नागरी आरोग्य केंद्र खदान आदर्श कॉलनी 16 नंबर शाळा नागरी 

2)नागरी आरोग्य केंद्र सिंधी कॅम्प खडकी 

3) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट

4) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड

5) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना

6)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी 

7)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ

8) GMC अकोला

9) IMA hall सिव्हिल लाईन चौक, अकोला 

10) आर .के .टी आयुर्वेदिक कॉलेज जठारपेठ वेळ सकाळी9 ते दुपारी 1 राहील


 18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covishield(*100 ऑनलाइन अपॉइंटमेंट  प्रथम डोस तथा  द्वितीय डोस) [ 200 कूपन   प्रथम डोस तथा द्वितीय डोस ]साठी

पद्धतीने सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.




1)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड

2) लेडी हार्डिंग DHW

3)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर

मनपा शाळा क्रमांक 22 


18+ च्या वरील  नागरिकांकरिता *Covaxin (* 100ऑनलाइन अपॉइंटमेंट  प्रथम डोस तथा द्वितीय डोस) [  200कूपन  प्रथम तथा  द्वितीय डोस ]साठी

 सकाळी 09  ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.



ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपासून सुरू राहील


*अकोला महानगरपालिका अकोला.




               विसर्ग अलर्ट


घुंगशी ब्यारेज-दि 03/10/21 रोजी सकाळी 6.00 वा ,सध्या पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे ब्यारेज ची सर्व व्दारे वर उचलून ठेवण्यात आली आहेत नदीपात्रात 10 गेट मधून पूराचे पाणी वाहत आहे पाण्याची पातळी 258.00 मी असुन पूर  विसर्ग 3070 घमीप्रसें आहे.



दिनांक 03/10/2021

वेळ : 8.00 AM वाजता 

मोर्णा नदी 

नदी पातळी ...269.70 M.

उंची.........  1.10 M.

विसर्ग....... 270.94 Cumecs



Purna Barrage-2(Ner Dhamna)

Dt. 03/10/2021 @ 08.00 P.M

Level -246.00

Gate- 12 Open(All)

Discharge- 12 gate 

7742. 00घमीप्रसे.



           काटेपूर्णा प्रकल्प 

आज दि. *०३/१०/२०२१* रोजी सकाळी *१०.००* वाजता काटेपूर्णा  प्रकल्पातुन नदीपात्रात करण्यात येत असलेला  विसर्ग बंद करण्यात आला आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील   नागरिकांनी  सावध राहावे.


   काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष


 


आज दि. *०३/१०/२०२१* रोजी साय. *०५:००* वाजता वान  प्रकल्पातुन नदीपात्रात करण्यात येत असलेला  विसर्ग बंद करण्यात आला आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील   नागरिकांनी  सावध राहावे.     


      *वान प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष*




*मन प्रकल्प, शिरला*

*दि. 3-10-2021*

*वेळ: 20.30

जलाशय पाणीपातळी= 374.60मी. 

जीवंत साठा - 36.83 Mem .   

 टक्केवारी= 100 %


 *दि. 3.10.2021 रोजी   20.30वाजता* मन प्रकल्पाचे 1 द्वार 0.10

मीटरने उघडण्यात आले आहे.

सद्यस्थितीत प्रकल्पाचे 1 द्वार  0.10 मीटरने चालू असून एकूण= 12.00m3/से विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.*


धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.


नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे


मन प्रकल्प, पूर नियंत्रण कक्ष शिरला नेमाने




दुकानाला आग;जीव वाचविण्यासाठी नागरिकांनी पहिल्या मजल्यावरून मारल्या उड्या


अकोला:टिळक रोडवरील बॉम्बे लॉज खाली असलेल्या महावीर पॅलेस दुकानाला आज पहाटे आग लागली. शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. आगेने रौद्ररूप धारण केल्याने यावेळी लॉज मध्ये असलेल्या लोकांनी जीव वाचविण्यासाठी खाली उड्या मारल्या.यात एकाला गंभीर दुखापत झाली.त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान,अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. आगे मध्ये दुकानातील समान जळून खाक झाले. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नाही. मात्र आगे मध्ये दुकानातील सामान जळून खाक झाले. दोन-अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे.


टिप्पण्या