- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Akola news letter: अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना मदतः 84 कोटी 26 लक्ष रुपये वितरीत व इतर बातम्या वाचा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला,दि.13: तोक्ते चक्रीवादळ व जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना मदतीसाठी 84 कोटी 26 लक्ष रुपये मदत वाटपास सर्व संबंधित तहसिलदारांकडे वितरीत करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निगर्मित केले आहे.
तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या बाधितांना यापुर्वी 8 कोटी 96 लक्ष रुपये मदतनिधी वितरीत करण्यात आला होता. त्यात अकोला तालुक्याकरीता 5 कोटी 90 लक्ष तर बार्शीटाकळी तालुक्याकरीता 3 कोटी 6 हजार रुपये तहसिलदार यांच्या मार्फत नुकसानग्रस्त बाधीतांना वितरीत करण्यात आले होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतीपिकांच्या तसेच अन्य नुकसानीकरीता बाधित नागरीकांना मदत वाटपाकरीता 84 कोटी 26 लक्ष निधी वितरीत करण्यात आले आहे. त्यात अकोला तालुक्याकरीता 32 कोटी 71 लक्ष, बार्शिटाकळी तालुक्याकरीता 16 कोटी 67 लक्ष, अकोट तालुक्याकरीता 4 कोटी 10 लक्ष, तेल्हारा तालुक्याकरीता 1 कोटी 51 लक्ष, बाळापूर तालुक्याकरीता 14 कोटी 63 लक्ष, पातुर तालुक्याकरीता 14 कोटी 21 लक्ष तर मुर्तिजापूर तालुक्याकरीता 43 लक्ष असे एकूण 84 कोटी 34 लक्ष 96 हजार रुपये निधी वितरीत करण्यात आले असून हा निधी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसिलदार यांच्या मार्फत नुकसानग्रस्त बाधीतांना वितरीत करण्यात येणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.
******
प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) दसऱ्याला सुरू राहील
अकोला, दि.13: दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. त्याअनुषंगाने नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून नागरिकांना वाहनाचा ताबा मिळावा. तसेच शासकीय महसूल जमा व्हावा याकरीता शुक्रवार दि. 15 ऑक्टोंबर रोजी दसऱ्याच्या सार्वजनिक सुटीच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु राहिल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी कळविले आहे.
निधन वार्ता: गणेशराव पोटे यांना मातृशोक
अकोला: श्री रूपनाथ संस्थानचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव पोटे यांच्या आई रुखमाबाई श्रावणजी पोटे यांचे आज दिनांक 13 ऑक्टोंबर 2021 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुलं, तीन मुली, सुना, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांचे वय 92 वर्षाचे होते. त्यांची अंतयात्रा गुरुवारी सकाळी 9 वाजता त्यांचे राहते घरी दहीहांडा येथून निघणार आहे.
******
बार्शिटाकळी दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचे रविवारी लोकार्पण
अकोला,दि.13: बार्शिटाकळी (अकोला) येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे नविन इमारतीचे लोकार्पण रविवार 17 ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. या इमारतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे प्रशासकीय न्यायमूर्ती सुनिल शुक्रे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी उच्च न्यायालय मुंबई व नागपूर खंडपीठ व अकोला न्यायिक जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अनिल किलोर व अकोला जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश यनशिवराज खोब्रागडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
******
आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टीजेनमध्ये शुन्य पॉझिटीव्ह
अकोला,दि.13: आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 193 अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.12) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्येही कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57871(43265+14429+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह शुन्य
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 325426 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 321796 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3228 नमुने होते. आजपर्यंत एकूण 325426 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 282161 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शून्य पॉझिटिव्ह
आज दिवसभरात आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, याची नोंद घ्यावी.
17 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57871(43265+14429+177) आहे. त्यात 1138 मृत झाले आहेत. तर 56716 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 17 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 99 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.12) दिवसभरात झालेल्या 99 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात मुर्तिजापूर येथे चार, अकोला महानगरपालिका क्षेत्रात येथे 57, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 33, हेगडेवार लॅब येथे पाच चाचण्या, अशा एकूण 99 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.
उद्या दिनांक 14/10/2021 रोजी खालील प्रमाणे लसीकरण उपलब्ध राहील.
1)नागरी आरोग्य केंद्र खदान आदर्श कॉलनी 16 नंबर शाळा नागरी
2) मनपा शाळा क्रमांक 3 व 4 (टेम्पल गार्डन शाळा)प्रांगणात
रामदासपेठ पोलिस स्टेशनच्या बाजूला
3) कस्तुरबा हॉस्पिटल डाबकी रोड
4) नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर आयुर्वेदिक दवाखाना
5)नागरी आरोग्य केंद्र उमरी विठ्ठलनगर मोठी उमरी
6)नागरी आरोग्य केंद्र हरिहर पेठ
7) GMC अकोला
8) IMA hall सिव्हिल लाईन चौक, अकोला
9) नागरी आरोग्य केंद्र न्यु शिवाजी नगर शिवसेना वसाहत मनपा शाळा
10) जिल्हा परिषद शाळा कौलखेड गजानन महाराज मंदिर च्या पाठीमागे
11) आर के टी आयुर्वेदिक कॉलेज जठारपेठ
12) नागरी आरोग्य केंद्र नायगाव एपीएमसी मार्केट जवळ
13)मोहम्मद अली रोड ताजना पेठ पोलीस चौकी
18+ च्या वरील नागरिकांकरिता *Covishield(*100 ऑनलाइन अपॉइंटमेंट प्रथम डोस तथा द्वितीय डोस) [ 200 कूपन प्रथम डोस तथा द्वितीय डोस ]साठी
पद्धतीने सकाळी 09 ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.
1)भरतीया हॉस्पिटल टिळक रोड
2) लेडी हार्डिंग DHW
3)नागरी आरोग्य केंद्र कृषी नगर
मनपा शाळा क्रमांक 22
4) गौतम नगर जुना आरटीओ रोड
5) मलेरिया कॉलनी कौलखेड
6) नेहरूनगर राष्ट्रीय शाळा रोड
हनुमान व्यायाम शाळा उमरी
18+ च्या वरील नागरिकांकरिता *Covexin (* 100ऑनलाइन अपॉइंटमेंट प्रथम डोस तथा द्वितीय डोस) [ 200कूपन प्रथम तथा द्वितीय डोस ]साठी
सकाळी 09 ते दुपारी 03 या वेळेत उपलब्ध राहील.
ऑनलाइन अपॉइंटमेंट आदल्या दिवशी पासून सुरू राहील
अकोला महानगरपालिका अकोला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा