- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला रेल्वे जंक्शन संग्रहित छायाचित्र
******
अकोला: दसरा आणि दिवाळी सणासुदी काळात होणाऱ्या गर्दीमुळे प्रवासी सुविधे करिता दक्षिण मध्यरेल्वे अकोला -तिरुपती - अकोला दरम्यान ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान उत्सव विशेष गाडीच्या दहा फेऱ्या चालविणार आहे.
याप्रमाणे धावेल गाडी
गाडी संख्या 07605 तिरुपती ते अकोला विशेष गाडी तिरुपती येथून शुक्रवार दुपारी 12.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 12.15 वाजता अकोला येथे पोहोचेल. ही गाडी तिरुपती येथून दिनांक 15.10.2021, 22.10.2021, 29.10.2021, 05.11.2021 आणि 12.11.2021 ला सुटेल.
गाडी संख्या 07606 अकोला ते तिरुपती विशेष गाडी अकोला येथून रविवारी सकाळी 08.20 सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 06.25 वाजता तिरुपती येथे पोहोचेल. हि गाडी अकोला येथून दिनांक 17.10.2021, 24.10.2021, 31.10.2021, 07.11.2021 आणि 14.11.2021 ला सुटेल.
गाडी संख्या 07605//07606 तिरुपती - अकोला - तिरुपती उत्सव विशेष गाडी वाशीम, हिंगोली, बसमत, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद, निझामाबाद, कामारेडी, काचीगुडा, महबुबनगर, गाद्वाल, कर्नुल सिटी, धोने, अनंतपुर, धर्मावरम, कादिरी, मदनपल्ली रोड, पिलर, पाकाला या रेल्वे स्थानकावर दोन्ही दिशेला थांबेल.
या गाडीत तृतीय श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय श्रेणी शयन आणि द्वितीय श्रेणी खुर्सी यान असे डब्बे असतील. या उत्सव विशेष गाड्या पूर्णतः आरक्षित असतील.
******
कोष्टी समाजातर्फे कोरोना योद्धा, ज्येष्ठ नागरीक व कलावंतांचा सत्कार
अकोला : कोरोना संसर्गजन्य साथीच्या प्रार्दुभावात समाज बांधव बर्याच काळापासून एकमेकांपासून दूर झालेल्या समाज बांधवांसोबत संवाद साधता यावा, अकोल्यातील सूर ताल समुहाकडून कोष्टी समाजातील बांधवांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
लॉकडाऊनच्या काळात सामाजिक कार्य करणारे सुरताल समुहाचे मुख्य मार्गदर्शक श्रीकर डहाके, डॉ. संजय तिडके, विलास लोळे, दिलीप लोकरे, रामराव घाटे यांच्या पुढाकाराने समाजातील अविनाश खुंटे, अजय अलोने, निलेश भड, संतोष डहाके, दीपक डहाके यांचे सहकार्य लाभले. अनेक कुटूंबामध्ये जावून शिदावाटपाचे कार्य केले. कोरोना काळात अशाप्रकारे मदती करणार्या समाजातील समाजसेवकांच्या, ज्येष्ठ नागरिकांचा आणि गायक, कवी, लेखक साहित्यिक व कलावंतांचा यावेळी सत्कार करण्यात आले.
स्थानिक हॉटेल मध्ये स्व. नामदेवराव सिताराम धोपे यांचे स्मृतीप्रित्यर्थ शशिकांत ना. धोपे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कोष्टी समाज परिषदेचे प्रा. डॉ. संजय तिडके हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तर शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. सुचिता पाटेकर ह्या प्रमुख अतिथी तर मार्गदर्शक म्हणून सतिश दाभाडे, विलास भड उपस्थित होते.
या कार्यक्रमास अखिल महाराष्ट्र कोष्टी समाजाचे धामकर, प्रफुल्ल जुमडे, निर्मला धोपे, रेखा हिंगे, प्रशांत उकंडे, सुनिता कोरडे, सविता धोपे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत उकंडे यांनी तर आभारप्रदर्शन माधवी महाजन यांनी केले.
******
कोरोना अलर्ट
*आज गुरूवार दि.१४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिवसभरात प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-३५७*
*पॉझिटीव्ह-शून्य*
*निगेटीव्ह-३५७*
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शून्य+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य= एकूण पॉझिटीव्ह- शून्य
*अतिरिक्त माहिती*
आज दिवसभरात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-४३२६५+१४४२९+१७७=५७८७१*
*मयत-११३८*
*डिस्चार्ज-५६७१६*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)-१७*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*
सूचना
दिनांक 15/10/2021 रोजी सर्व
कोवीड लसीकरण सेंटरला विजयादशमी दसऱ्यानिमित्त सर्वांना सुट्टी राहील.
अकोला महानगरपालिका अकोला
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा