A tiger hunts a bull in Raikhed: Akola: रायखेड कोठा परिसरात वाघाने केली बैलाची शिकार;परिसरात भीतीचे वातावरण

Akola: Telhara:A tiger hunts a bull in Raikhed Kotha area; an atmosphere of fear in the area





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: तेल्हारा तालुक्यातील रायखेड कोठा परिसरात वाघाने एका बैलाची शिकार केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने परिसराची पाहणी केली असून,नागरिकांनी खबरदारी घ्यावी,असे आवाहन केले आहे. काही नागरिकांनी वाघाला प्रत्यक्ष पाहिले असल्याचे सांगितले.




रायखेड ते हिंगणी रोडवर रायखेड येथील शेतकरी विनोद मोडोकार यांच्या शेतात एका बैलाला वाघाने ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. 



वाघाच्या पावलाचे ठसे

वन विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत वाघाच्या पावलाचे ठसे व अर्धवट खाल्लेले बैलाचे धड आढळून आले आहे. त्यामुळे रायखेड कोठा परिसरात वाघाचा वावर असल्याचे दिसून आल्याने दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाची पाहणी केली. वाघ दोन तीन दिवस पुन्हा या परिसरात येऊ शकतो, यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन  वनविभागाने केले आहे. 




येथे क्लीक करून पाहा video

Akola: Telhara:A tiger hunts a bull in Raikhed Kotha area; an atmosphere of fear in the area

टिप्पण्या