ZP:PS:By-election:Akola:reviews: जि.प. पं.स. पोटनिवडणूक:जिल्हाधिकारी यांनी घेतला निवडणूक यंत्रणेचा आढावा

Z.P.  P.S.  By-election: District Collector reviews election system




अकोला, दि.१७: जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात आयोजित या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्यासह सर्व  उपविभागीय अधिकारी तसेच तहसिलदार आदी उपस्थित होते.




यावेळी देण्यात आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे १४ निवडणूक विभाग व पंचायत समितीचे २८ निर्वाचन गणात निवडणूक होणार आहे. 



या निवडणुकीत १ लाख ७७ हजार ७००  स्त्री, १ लाख ९४ हजार १९ पुरुष तर एक इतर असे एकुण ३ लाख ७१ हजार ७२० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यासाठी तेल्हारा तालुक्यात ७७, अकोट ८१, मुर्तिजापुर ८३, अकोला ८५, बाळापूर ७४, बार्शीटाकळी ४९, पातुर ३९ असे एकुण ४८८  मतदान केंद्र असतील. 



तालुकानिहाय नियोजन करुन जिल्ह्यात ४४ क्षेत्रिय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी ६०७ केंद्राध्यक्ष व १८२१ मतदान अधिकारी असे २४२८  जणांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचेही नियोजन करण्यात आले असून २४ ते ३० या दरम्यान तालुकास्तरावर हे प्रशिक्षण होईल.


या निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे.


यावेळी तालुकास्तरावर  मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणे, ईव्हीएम बद्दल जनजागृती करणे, उमेदवारांच्या खर्चाचा तपशिल गोळा करणे याबाबत  उपस्थितांना सुचना देण्यात आल्या. जिल्हा परिषद निवडणुक विभागासाठी एका उमेदवाराची खर्च मर्यादा चार लक्ष तर पंचायत समिती निर्वाचक गणासाठी एका उमेदवाराची खर्च मर्यादा तीन लक्ष रुपये इतकी असल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात जिल्हा परिषद  निवडणुक विभागासाठी (१४) ९५ उमेदवार तर पंचायत समिती गणासाठी(२८) १६१ नामनिर्देशित उमेदवार आहेत.  


निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक राबवावी. आचारसंहितेचे काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश यावेळी देण्यात आले.



                      ******




अकोला येथे २४ रोजी डाक अदालत



Postal court on 24th at Akola



अकोला, दि.१७: डाक सेवेबाबत जसे टपाल, स्पीड पोस्ट डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनी ऑर्डर बाबतची तक्रार सहा आठवड्यापेक्षा जास्त काळ अनुत्तरीत असल्यास तक्रारीचे निवारण लवकर होण्यासाठी शुक्रवार २४ रोजी अकोला प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालय येथे डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.


डाक अदालतीत आपली तक्रार देतांना अर्ज व त्यासोबत मूळ तक्रारीची प्रत ज्या अधिकाऱ्याकडे दाखल केली त्याचा हुद्दा व दाखल केल्याची तारीख. एका अर्जासोबत एकच तक्रार असावी. आपली तक्रार  आपली तक्रार प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालय, अकोला विभाग, सिव्हील लाइन्स, अकोला  यांच्याकडे २१ पूर्वी समक्ष अथवा पोस्टाने पाठवावी. ही डाक अदालत शुक्रवार २४ रोजी  सकाळी ११ वाजता प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालय, अकोला विभाग, सिव्हील लाइन्स, अकोला येथे होईल. डाक अदालतीत अर्जदार  व्यक्तीने स्वत:चे खर्चाने हजर राहावे, असे डाकघर अधीक्षक यांनी कळविले आहे.







टिप्पण्या