VBA:dam and lake areas:Akola: जिल्ह्यातील धरणे आणि तलाव परिसरात जमावबंदी आदेश लागू करावा - राजेंद्र पातोडे

A curfew should be imposed in the dam and lake areas of the district - Rajendra Patode (file photo)






अकोला, दि. १६: अकोला जिल्ह्यात ९८.१ % पाऊस पडला असून, जिल्ह्यातील धरणे आणि तलाव ९० ते ९५ % भरले आहेत. येत्या काही दिवसात अधिक पर्जन्यमानाची शक्यता असल्याने धरणे आणि तलाव परिसरात जमावबंदी आदेश लागू करावा, अशी मागणी वंचित बहूजन आघाडीचे मीडिया पॅनलिस्ट  राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.




अकोला जिल्ह्यात आजवर सरासरी ९८.१% पाऊस झाला आहे. त्यामुळे दगडपारवा धरणात ९४.१%, काटेपुर्णा धरणात ९८.५८%, निर्गुणा १००%, वान ९१.८५%, पोपटखेड ९२.६% आणि मोर्ना ८६.६०% असा जलसाठा जमा आहे. जिल्ह्यातील तलाव आणि नाले देखील प्रवाही असून, अकोला जिल्ह्यात १५ ते २० सप्टेंबर ह्या कालावधीत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.




जिल्ह्यातील धरण, तलाव परिसरात पुराच्या काळात मोठ्या प्रमाणात शेती आणि घराचे नुकसान झाले होते. सोबतच जिवीतहानी देखील झाली आहे. त्यावरील उपाययोजना म्हणून जिल्ह्या प्रशासनाने तातडीने धरण आणि तलाव परिसरात तात्काळ जमावबंदी लागू करावी. जेणेकरून संभाव्य जिवीतहानी टाळता येऊ शकते. जमावबंदी आदेश देण्याबरोबरच पोलीस आणि महसुल यंत्रणा आणि पाटबंधारे विभागाला देखील ह्या परिसरात जमाव गोळा होणार नाही ह्यावर जबाबदारी देण्याची अपेक्षा देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी व्यक्त केली आहे. 



दरम्यान ह्यापुढे धरण किंवा तलाव परिसरात एखादा अपघात किंवा मृत्यू झाल्यास त्याला जिल्हा प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही वंचितने दिला आहे.

टिप्पण्या