Vande Bharat train: Akola: अकोला येथून वन्दे भारत रेल्वे गाडी धावणार; खासदार संजय धोत्रे यांच्या मागणीला मिळाली हिरवी झेंडी

Vande Bharat train will start from Akola railway station;  Success to MP Sanjay Dhotre's efforts




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: अकोला रेल्वे स्थानक हे मुंबई नागपूर कोलकाता तसेच दक्षिण व उत्तर भारताला जोडणारे महत्त्वपूर्ण रेल्वेस्टेशन आहे. पश्चिम विदर्भातील महत्वाचे स्थान व बाजारपेठ असल्यामुळे दक्षिण भारत उत्तर भारत सह कोलकाता मुंबई दिल्ली कर्नाटक ईलाहबाद वाराणसी जबलपूर या भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता, वन्दे भारत एक्सप्रेस (गतिमान) रेल्वे अकोला येथून नागपूर-मुंबई  सुरू करण्यात यावी, (Gatiman Express/Vande Bharat Express train between Nagpur and Mumbai via Akola.) अशी मागणी माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री राज्यमंत्री खासदार संजय धोत्रे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. नामदार वैष्णव यांनी तात्काळ दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.






अकोला शहरातून मुंबई नागपूर नांदेड तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल राजस्थान गुजरात पंजाब या भागातून मोठ्या प्रमाणात व्यवसाय होत असतो. अकोला शहर  बाजारपेठेचे महत्त्व लक्षात घेता तसेच पश्चिम विदर्भातील व मराठवाड्याला जोडणारा महत्त्वाचा रेल्वे स्टेशन असल्यामुळे ब्रिटिश काळापासून या रेल्वेस्थानकाला महत्त्व आहे. त्यामुळे ज्या भागात प्रवाशांची आवक-जावक लक्षात घेता वन्दे भारत गाडी नागपूर- मुंबई, मुंबई कलकत्ता, तसेच उत्तर-दक्षिण पूर्वकडे जोडण्यासाठी सुरू करण्यात यावी अशी मागणी 19 ऑगस्ट रोजी खासदार संजय धोत्रे यांनी रेल्वेमंत्री नामदार अश्विन वैष्णव यांच्याकडे केली होती याची दखल घेऊन खासदार संजय  धोत्रे यांना या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन रेल्वे बोर्ड अकोलेकरांना सुविधा उपलब्ध करून देईल, असे आश्वासन घेऊन यासंदर्भात प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात दिशानिर्देश दिले आहे.

टिप्पण्या