terrorists arrest: Delhi Police: पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला; दिल्ली, उत्तर प्रदेश,महाराष्ट्र येथून दहशतवाद्यांना अटक

6 terrorists arrested from Delhi, Maharashtra, Uttar Pradesh




दिल्ली: मुंबईसह देशातील इतर प्रमुख महानगरांमध्ये सणासुदीच्या काळात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला आहे. दिल्लीसह महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातून 6 दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे.



दहशतवादी यांच्याकडून मोठय़ा प्रमाणावर विस्फोटके व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत. या कटामागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिसचा हात असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्या सांगण्यावरून दहशतवादी रामलीला आणि नवरात्रोत्सवात बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. 



दहशतवाद्यांचे नेटवर्क विविध राज्यांमध्ये पसरले होते. दिल्ली पोलिसांनी मागील महिनाभर मल्टीस्टेट ऑपरेशन चालवले. ठिकठिकाणी कारवायांचा धडाका लावला आणि विविध राज्यांतून 6 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.




ऐन सण उत्सव काळात भारतात मोठी जीवितहानी घडवण्याचा पाकिस्तानचा कट होता. यासाठी दोन दहशतवाद्यांना पाकिस्तानात बॉम्ब बनवण्याचे आणि एके-47 चालवण्याचे 15 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन दहशतवादी एप्रिल महिन्यात मस्कतला गेले होते. तेथून त्यांना जहाजातून पाकिस्तानला नेण्यात आले होते.




दहशतवाद्यांचा हा कट महाराष्ट्रात उधळून लावला गेला. पहिली अटक महाराष्ट्रातूनच करण्यात आली. सर्वात आधी दहशतवादी सालेमला पकडण्यात आले. नंतर दोघांना दिल्लीतून अटक केली, तर उत्तर प्रदेशातून तिघांना पकडले.




अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांचे दोन ग्रुप बनवले होते. एका ग्रुपला दाऊदचा भाऊ अंनिस इब्राहिम सूचना देत होता. सीमेपलीकडून शस्त्रास्त्र आणून ती वेगवेगळ्या राज्यांत पाठवण्याची या ग्रुपवर जबाबदारी सोपवली होती. हा ग्रुप सणासुदीत स्फोट घडवण्यासाठी जागोजागी शस्त्रास्त्र ठेवणार होता. रामलीला आणि नवरात्रीतील गर्दीची ठिकाणे निशाण्यावर होती. दहशतवाद्यांना पाहिजे ती सर्व मदत पुरवण्याचे काम दुसऱ्या ग्रुपवर सोपवले होते.


टिप्पण्या