Purna floods:Gandhigram: पूर्णा नदीला पूर: गांधीग्राम पुल पाण्याखाली; अकोला-अकोट मार्ग वाहतुकीसाठी बंद, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा

Purna river floods: Gandhigram bridge under water;  Akola-Akot road closed for traffic



 


नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: पश्चिम विदर्भात काल पासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नदी नाले ओढे दुथडी वाहत आहे. जल प्रकल्प तुडुंब भरत असल्याने प्रशासनाने पाण्याची आवक पाहून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. दरम्यान अमरावती जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाल्याने अकोला जिल्ह्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीला पूर आला आहे. गांधीग्राम येथील नदी पुलावरून अंदाजे 3 फूटवर पाणी वाहत असल्याने अकोला-अकोट मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. 



काटेपूर्णा, खडकपूर्णा या प्रकल्पांचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. सोमवार पासून अकोला जिल्हात पावसाने हजेरी लावली  आहे. रात्रभर चांगला पाऊस झाला. मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. दुपारी पावसाने थोडी उघाड दिली. तर कुठे रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जल प्रकल्प भरले आहेत.   प्रकल्पांमध्ये सरासरी ८० टक्क्यांपर्यंत जलसाठा झाला आहे. दरम्यान काटेपूर्णा आणि खडकपूर्णाचे दोन दरवाजे उघडले  आहे. नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.



नदी-जल प्रकल्प स्थिती



दिनांक 07/9/21

वेळ : 12.00 AM वाजता 

मोर्णा नदी 

नदी पातळी ...269.50

उंची.........  0.90

विसर्ग.......  134.54



पूर्णा बॅरेज-2 (नेरधामणा)                07/09/2021 सध्या पावसाळा सुरू झाला आहे.  त्यामुळे बॅरेजची सर्व व्दारे वर उचलून ठेवण्यात आली आहेत, दुपारी 12.00 वाजता पूर पातळी 243.50 मी.असुन 12 गेट मधून पूराचे पाणी वाहत आहे पूर विसर्ग 4672.92 घमीप्रसें आहे.



दिनांक 07/9/21

वेळ : 1.00 PM वाजता 

मोर्णा नदी 

नदी पातळी ...269.70

उंची.........  1.10

विसर्ग.......  170.94



 *विसर्ग अलर्ट*

*मन प्रकल्प, शिरला*

*दि. 7-09-2021*

*वेळ: 14:00pm

जलाशय पाणीपातळी= 374.30.    मी.

जीवंत साठा टक्केवारी= 35.47


आज *दि. 07-09-2021 रोजी   14.00 Am  वाजता*  मन प्रकल्पाचे 3 द्वार 0.10 मीटरने उघडण्यात आले आहे.

 *सद्यस्थितीत प्रकल्पाचे 3 द्वार  0.10 मीटरने चालू असून एकूण= 36.00m3/से विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.*


धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.


नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे


मन प्रकल्प, पूर नियंत्रण कक्ष*


 पूर्णा बॅरेज-2 (नेरधामना)


07/09/2021 सध्या पावसाळा सुरू झाला आहे.  त्यामुळे बॅरेज ची सर्व व्दारे वर उचलून ठेवण्यात आली आहेत, दुपारी 02.30 वाजता पूर पातळी 245 मी.असुन 12 गेट मधून पूराचे पाणी वाहत आहे पूर विसर्ग 6462 घमीप्रसें आहे.

पुराची पातळी वाढत असून तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी  सावध राहावे.



दिनांक 07/9/21

वेळ : 2.00 PM वाजता 

मोर्णा नदी 

नदी पातळी ...270.10

उंची.........  1.50

विसर्ग.......  249.40



दिनांक 07/9/21

वेळ : 3.00 PM वाजता 

मोर्णा नदी 

नदी पातळी ...270.10

उंची.........  1.50

विसर्ग.......  249.40



*विसर्ग अलर्ट*

*खड़कपूर्णा प्रकल्प, दे. मही*

*दि. 07-09-2021*

*वेळ: 5.00 pm Hrs.*

जलाशय पाणीपातळी= 520.06 मी.

जीवंत साठा टक्केवारी= 84.45%


आज *दि. 07-09-2021 रोजी   5:00 pm  वाजता*  खड़कपूर्णा  प्रकल्पाचे 7 द्वार 0.20 मीटरने उघडण्यात आले आहे.

 *सद्यस्थितीत प्रकल्पाचे 7 द्वार  0.20 मीटरने चालू असून एकूण= 5096.03 क्यूसेक्स(144.2cumec】 विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.*


धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.


नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे


*खड़कपूर्णा प्रकल्प, पूर नियंत्रण कक्ष*


टिप्पण्या