Punjab's politics: Charanjit Singh Channi: political congress:India: पंजाबचे राजकारण: शर्यतीत नसतानाही चरणजीत सिंग चन्नी यांच्या मस्तकावर मुख्यमंत्रीपदाचा मुकुट



राजकारण:गल्ली पासून दिल्ली पर्यंत

       ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

Even though he is not in the race for the Chief Minister's post, Charanjit Singh Channi is being crowned as the Chief Minister.(file photo)





कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाबचे पुढील मुख्यमंत्री कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुखजिंदरसिंग रंधावा यांचे नाव शर्यतीत पुढे असताना, आता मात्र नवा चेहरा समोर आला आहे. काँग्रेस पक्षातील दोन दिवसांच्या विचारमंथन आणि वरच्या वर झालेल्या बैठकानंतर पक्षाने चरणजीत सिंग चन्नी यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित केले. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसतानाही चरणजीत सिंग चन्नी यांच्या मस्तकावर मुख्यमंत्रीपदाचा मुकुट चढविला जात आहे. 



चरणजीत सिंग चन्नी यांची पार्श्वभूमी

Charanjit Singh Channi was also associated with the youth Congress and at the same time he came close to Rahul Gandhi.(file photo)





चरणजीत सिंग चन्नी यांचे गांधी कुटुंबाशी  जवळचे संबंध आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे कट्टर विरोधक नवज्योतसिंग सिद्धू आणि सुखजिंदरसिंग रंधवा यांच्याशिवाय सुनील जाखड, प्रताप सिंह बाजवा यांची नावे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होती. नंतर,  अचानक काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी यांचे नाव समोर आले. परंतू प्रकृतीचे कारण देत सोनी यांनी मुख्यमंत्री पदासाठी स्पष्ट नकार कळविला. यानंतर सुखजिंदर सिंग रंधावा यांचे नाव  निश्चित मानल जात असतानाच पक्षाने बड्या नेत्यांना बाजुला सारत शर्यातीत नसलेल्या चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर सायंकाळी शिक्कामोर्तब केला. 



चरणजीत सिंग चन्नी हे काँग्रेसचा पंजाबमधील दलित चेहरा आहे. ते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे निकटवर्तीय होते, मात्र काही कारणास्तव नंतर ते सिंग यांच्या विरोधात गेले होते. 2017 मध्ये चन्नी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री बनले होते. मात्र, ते स्वत: बारावी उत्तीर्ण असल्याने त्यांच्या पदाबाबत वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मात्र त्यांनी 2017 मध्ये पंजाब विद्यापीठातून पदवी मिळविली.



चरणजीत सिंग चन्नी हे पंजाब राज्यातील चमकौर साहिब मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी आम आदमी पक्षाच्या चरणजीत सिंग यांचा 12,000 मतांनी पराभव केला होता. त्यापूर्वी 2012 च्या निवडणुकीत त्यांनी सुमारे 3600 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. चरणजीत सिंग चन्नी हे युवक काँग्रेसशीही जोडले गेले त्याच काळात ते राहुल गांधींच्या जवळ आले होते.



अश्या घडल्या घडामोडी





आता काँग्रेसने ज्याला हवे त्याला मुख्यमंत्री बनवावे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया अमरिंदर सिंग यांनी राजीनाम्यानंतर दिली होती. माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेस नेत्या अंबिका सोनी यांनी देखील पंजाबचे मुख्यमंत्रीपद स्विकारण्यास स्पष्टच नकार दिला. अंबिका सोनी यांच्या नकारानंतर सुखजिंदरसिंग रंधावा यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. अधिकृत घोषणाची काँग्रेस वर्तुळात वाट पाहणे सुरू असतानाच चरणजीत सिंग चन्नी यांचे नाव समोर आले. यामुळे काँग्रेस मधील अनेक मातब्बराना झटका बसला.


सोनिया गांधी यांनी अंबिका सोनी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती.मात्र अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर स्पष्ट शब्दात नाकारली. पंजाबचा मुख्यमंत्री  हा शीख व्यक्तीच असला पाहिजे, असे माझे मत सोनी यांनी व्यक्त केले. मागील पन्नास वर्षांपासून मी हेच म्हणते आहे. म्हणून मी मुख्यमंत्रीपदाला नकार दिला असून आज संध्याकाळपर्यंत नाव निश्चित होईल, असेही अंबिका सोनी यांनी म्हटले होते. त्यानंतर, सोनी यांच्या म्हणण्यानुसार शीख व्यक्तीलाच पसंती देण्यात आली. त्यानुसार, सुखजिंदर सिंग यांचे नाव हायकमांडकडे देण्यात आले.  आमदारांनी देखील हेच नावे पुढे केले होते. काँग्रेसचे सरचिटणीस आणि निरीक्षक यांनी देखील सुखजिंदर सिंग यांचे नाव पक्षश्रेष्ठींसमोर ठेवले होते. मात्र त्यानंतर अचानक मोठा बदल करून चरणजीत सिंग चन्नी यांचे नाव निश्चित करण्यात आले.





टिप्पण्या