Punjab Congress: political India: पंजाब काँग्रेसमध्ये घमासान:मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा; म्हणाले,पक्षाला माझ्यावर विश्वास नव्हता..

Punjab Congress: Chief Minister Capt Amarinder Singh resigns;  Said, the party did not believe me ..



चंदीगड पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा घमासान सुरू झाले आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनीही राजीनामा दिला असल्याने भारतीय राजकारणाची दिशा बदलण्याचे संकेत प्राप्त होत आहे.


कॅप्टन सिंग यांच्या विरोधात पक्षातीलच चाळीस आमदारांनी बंड पुकारला होता. दरम्यान काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांचे समर्थक चाळीस आमदारांनी चिठ्ठी लिहून नाराजी व्यक्त केल्यानंतर आज सायंकाळी पाच वाजता काँग्रेसने सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग सहभागी होणार नव्हते. बैठकीपूर्वीच ते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात पोहोचले होते. यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले.



राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन सिंग यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. सरकार न चालवू शकल्याचा संशय माझ्यावर व्यक्त करण्यात आला. हा माझा अपमान आहे. सध्या काँग्रेसमध्येच राहणार असून भविष्यात राजकीय पर्याय खुले असल्याचेही ते म्हणाले. तसेच त्यांना ज्याच्यावर विश्वास असेल त्याला मुख्यमंत्री बनवावे असेही ते म्हणाले.



कॅप्टन अमरिंदर सिंग पुढे म्हणाले की, असे वाटते की, पक्षाला माझ्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे मी सकाळीच ठरवले की, मुख्यमंत्रिपद सोडायचे आहे. आता पक्षाला ज्याच्यावर विश्वास आहे त्याला त्यांनी मुख्यमंत्री बनवावे. आता भविष्यातील राजकारणाबाबत जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी निर्णय घेईन. सध्यातरी मी काँग्रेसमध्ये आहे. 


 

2022 मध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. तसेच पंजाब काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झालेली असून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग विरूद्ध नवज्योतसिंग सिद्धू असे दोन गट पडले आहेत. अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिद्धू यांच्यात काही महिन्यांपासून राजकीय संघर्ष सुरू होता. अखेर आज राजीनामा प्रकरणाने या संघर्षवर तूर्तास पडदा पडला आहे.





टिप्पण्या