Narendra Dabholkar:Pune court: डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी तब्बल आठ वर्षांनंतर पाच जणांवर आरोप निश्चित

                                       file photo







पुणे: बहुचर्चित डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी तब्बल आठ वर्षांनंतर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. पुण्यातील विशेष न्यायालयाने बुधवारी पाच जणांवर आरोप निश्चित केले आहेत. पाचही आरोपी सनातन संस्थेशी निगडित आहेत. मात्र, सुनावणीवेळी पाचही आरोपींनी आपण दोषी नसल्याचा दावा केला. विशेष सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदकर यांनी बुधवारी पाचपैकी चार जणांवर हत्या, हत्येचा कट रचणे, शस्त्रास्त्र कायद्यातील तरतुदी आणि UAPA कायद्यांतर्गत आरोप निश्चित केले आहेत. 



यामध्ये आरोपी वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि विक्रम भावे यांच्यावर हत्येचा कट रचणे आदी आरोप ठेवण्यात आले आहेत. तर आरोपी संजीव पुनाळेकर याच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.



आरोप निश्चितीच्या वेळी न्यायालयाने आरोपींना विचारणा केली असता, सर्व आरोपींनी आपण दोषी नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना येरवडा कारागृहात हलवण्याचे आदेश दिले.




2013 मध्ये हत्या


20 ऑगस्ट 2013 रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारश्वर मंदिरा जवळ हत्या झाली होती. यानंतर 2014 मध्ये CBI ने या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून आपल्याकडे घेतला होता. 





टिप्पण्या