Maharaja Agrasen Jayanti 2021: महानगरात महाराजा अग्रसेन जयंती सोहळा: स्वर्गीय चिमणलाल भरतीया यांना मरणोत्तर अग्र विभूती पुरस्कार; तर 19 मान्यवरांना अकोला अग्र-आयकॉन जाहीर

Maharaja Agrasen Jayanti celebrations in the Akola: Posthumous Agra Vibhuti Award to the late Chimanlal Bhartiya;  19 dignitaries declared Akola Agra-icon (B A news 24)




 



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: सकल अग्रवाल समाजाचे आराध्य छत्रपती महाराजा श्री अग्रसेन यांच्या जयंतीच्या सोहळा कोरोना संकटामुळे अत्यंत साध्या पद्धतीने व ऑनलाइन स्तरावर स्तरावर घेण्यात येणार असल्याची माहिती अग्रवाल समितीच्या वतीने स्थानीय अग्रसेन भवन येथे आयोजित झालेल्या पत्रकार परिषदेत यावर्षी जयंती उत्सवाची माहिती देण्यात आली. 



यावेळी अग्रवाल समितीचे अध्यक्ष शैलेंद्र कागलीवाल, सचिव निकेश गुप्ता, अग्रसेन भवन ट्रस्ट अध्यक्ष गिरीश अग्रवाल, समिती उपाध्यक्ष अशोक अग्रवाल, एडवोकेट सुरेश अग्रवाल, डॉक्टर जुगल चिरानिया, प्रशांत लोहिया, निरंजन अग्रवाल, ममता अग्रवाल उपस्थित होत्या. 



सात आक्टोबर रोजी अग्रसेन भवन येथे अग्रसेन जयंतीचा मुख्य सोहळा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून आमदार विप्लव बाजोरिया, कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया नागपुर, अस्थिरोग तज्ञ  उत्सव अग्रवाल  उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात जिल्ह्यातील धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय कार्यात हिरीरीने धावून जाऊन सहकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवी स्वर्गीय चीमणलाल भरतिया यांना मरणोपरांत अग्रवाल समाजाचा मानाचा अग्र विभूती पुरस्कार बहाल करण्यात येऊन त्यांच्या कार्यास उजाळा देण्यात येणार आहे. दोन वर्षापासूनच सुरू झालेल्या या पुरस्काराचे प्रथम मानकरी माजी मंत्री स्वर्गीय जमनालाल गोयंका हे ठरले होते. यानंतर हा मान आमदार गोपीकिसन बाजोरिया यांना लाभला असून स्वर्गीय चिमणलाल भरतिया हे तृतीय समाजसेवी म्हणून या पुरस्काराचे मानकरी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या सोहळ्यात समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या समाजसेवी ना अकोला अग्रो आयकॉन हा पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे.




जयंती उपक्रमाचा प्रारंभ तीन ऑक्टोबर पासून अग्रसेन भवन परिसरात सामाजिक अंतर राखीत डॉक्टर नितिष अग्रवाल डॉक्टर श्रद्धा अग्रवाल यांच्याद्वारे श्री गणेश पूजनाने करण्यात येणार आहे. या दिवशी भवन परिसरात सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत डॉक्टर एम एस अग्रवाल, डॉक्टर सतीश गुप्ता यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात रक्त संकलन साई जीवन ब्लड बँकेची चमू करणार आहे. यावेळी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत अस्थिरोग तज्ञ डॉक्टर नितेश अग्रवाल यांचे अस्थिरोग तपासणी शिबिर आयोजित केले आहे. 7 ऑक्टोबर रोजी  87 वर्षावरील वयोवृद्धांचे विविध साहित्याने तुलादान करण्यात येणार आहे. तुला दानाच्या संकलित माहिती साहित्याचे वितरण अग्रवाल समाजातील गरजू नागरिकांना करण्यात येणार आहे. तसेच जयंती पर्वात महिला मंडळाच्या वतीने ऑनलाइन सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन केले आहे. 



समाजातील नागरिकांनी सात ऑक्टोबर रोजी महाराजा अग्रसेन जयंती दिनी आपल्या घरी रांगोळी, रोषणाई, तोरण पताका व दीप प्रज्वलन करून महाराजा अग्रसेन यांची जयंती उत्साहात साजरी करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. 



अकोला अग्र आयकॉन पुरस्कारांचे मानकरी



आमदार विप्लव बाजोरिया, माजी आमदार बबनराव चौधरी, माजी महापौर विजय अग्रवाल, एडवोकेट दिनेशचन्द्र तुलशान, कांतादेवी गोयंका, अशोक गुप्ता, श्रीकिशन अग्रवाल, डॉक्टर ओमप्रकाश रूहटिया, अशोक डालमिया, निशा अग्रवाल, उषा अग्रवाल, सीए बी एम अग्रवाल, ज्ञानचंद गर्ग, राष्ट्रीय कवि घनश्याम अग्रवाल, उद्योगपती सुशील खोवाल, नगरसेविका सुनीता अग्रवाल, सुमन अग्रवाल, डॉक्टर मधुसूदन बगडिया, पोलीस नाईक दिपाली अग्रवाल, निकेश गुप्ता.

टिप्पण्या