Kavad yatra 2021:Akola:pola: श्रीराजराजेश्वर कावड पालखी महोत्सव व बैल पोळा निम्मित अकोल्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त; जुने शहरात शुकशुकाट

Tight security in Akola for Shri Rajeshwar Kawad Palkhi Festival and Bull Hive;  Sukshukat in the old city



श्री राजराजेश्वर मानाची पालखी आगमन






नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार धार्मीक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी अकोला येथील राजराजेश्वर मंदिरात पारंपरिक पालखी कावड यात्रा उत्सवात केवळ मानाची एक पालखी व 25 शिवभक्तांना परवानगी देण्याचे आदेश निर्गमित केले होते. यानुसार आज केवळ श्री राजराजेश्वर मंडळाची मानाची पालखी काढण्यात आली. पहाटेच गांधीग्राम येथून पूर्णानदीचे जल आणून शिवभक्तांनी अभिषेक करून 75 वर्षांची परंपरा जोपासली. 



पहाटे आगमन



अकोल्याची कावड प्रथेत खंड पडू नये,म्हणून मागील वर्षी देखील मानाची पालखीच काढण्यात आली होती. यावर्षी देखील जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण पालखी मार्गात कडेकोट बंदोबस्त काल रात्री पासूनच तैनात केला गेला. मानाची श्री राजराजेश्वर मंडळाची पालखी रात्री गांधीग्राम कडे रवाना झाली होती. पहाटे अकोल्यात पोहचली. सिटी कोतवाली चौक पर्यंत पालखी वाहनात आणल्या गेली. येथून कावड शिवभक्तांनी खांद्यावर घेवून परंपरेनुसार श्री राजराजेश्वर मंदिरात आणून श्री राजेश्वराला जलाभिषेक घातला. मानाच्या पालखीत मंदीराचे विश्वस्थ व कावड पालखीचे पदाधिकारी सह 25 शिवभक्त सहभागी झाले होते. शेवटच्या श्रावण सोमवार आज 6 सप्टेंबर रोजी राजराजेश्वर मंदिरातील पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी शहरातून मानाच्या पालखीला गांधीग्राम येथुन राजेश्वर मंदिरापर्यंत दरवर्षीप्रमाणे पायदळ न आणता स्वतंत्र वाहनांमधून केवळ 25 व्यक्तींना प्रशासनने परवानगी दिली होती.

 


शेवटच्या श्रावण सोमवारी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गांधीग्राम ते राजराजेश्वर मंदिर मिरवणूक मार्गावर सोमवार 6 रोजी पहाटे चार पासून रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागु करण्यात आली असल्याने अकोलेकर मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील आपल्या आराध्य दैवतचे दर्शन करू शकले नाहीत.तसेच पालखी सोहळ्यात सहभागी होवू शकले नाहीत.



अकोला महानगरपालिका क्षेत्रातील संपुर्ण मिरवणूक मार्गावर कलम 144 लागु केल्या गेल्याने दरवर्षी सारखे कावड यात्रा महोत्सवची लगबग रस्त्याने नव्हती. पालखी मार्गावरचा शम्भूनाथ शिवशंकर बम बम भोलेचा गजर नव्हता. राजराजेश्वर मंदीरात भाविकांना प्रवेश नसल्याने अवघ्या जुने शहरात शुकशुकाट पसरला होता. 



परंपरे नुसार धार्मिक विधी प्रमाणे मंदिरातील विश्वस्थ, पुजारी यांनी श्री राजेश्वराची पुजा अर्चा केली. कावड पालखीत सहभागी भाविकांनी कोरोना नियम अटींचे पालन करून यंदाचा पालखी सोहळा पार पाडला.



पोळा चौकातही वर्दळ नाही



पोळा(पिठोरी पट) हा सण देखील अकोल्यात मोठ्या उत्साहात दरवेळी साजरा होतो. जुने शहरातील पोळा चौकात हा सण सार्वजनिक रित्या साजरा करण्याची मोठी परंपरा आहे. येथे भव्य बैलजोडीचा पुतळा आहे. परंतु मागील वर्षी सारखे यावेळी देखील येथे फक्त रूढी नुसार बैलजोडीचे पूजन केले गेले. बैलजोडी सजावट स्पर्धा देखील रद्द करण्यात आली आहे. पोळा देखील भरला नाही. त्यामुळे दरवर्षी सारखी या चौकात संध्याकाळी होणारी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली नाही. पूर्ण परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. उद्या पोळा कर निम्मित हा बंदोबस्त कायम राहणार आहे.


घरोघरी पूजा


अकोलेकरांनी यंदा पोळा हा सण घरीच बैलांची पुजा अर्चना करून साजरा केला. कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्‍मक आदेश लागु असल्याने बैलांना सजवुन त्‍याची मिरवणूक यंदा निघाली नाही. तर घरोघरी  धार्मिक विधी परंपरा व रूढी नुसार मातीच्या बैलांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.




भादवा (भाद्रपद) उत्सव

मोठे राममंदिरात भादवा उत्सव साजरा

टिळक मार्गावरील मोठे राम मंदिरात कोरोना नियम पाळत पारंपरिक पद्धतीने भादवा (भाद्रपद) उत्सव साजरा करण्यात आला.श्री राणी सती दादीजी माताचे पूजन करून, छप्पन भोग अर्पण केला गेला. पारंपरिक पद्धतीने भजन गाण्यात आले.


            





टिप्पण्या