Kavad yatra 2021:Akola city: शिवभक्तांनो मंदिर परिसरात गर्दी करू नका; जय बाभळेश्वर प्रतिष्ठानतर्फे आवाहन

Babhaleshwar temple kavad(file photo)



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने यंदा देखील कावड व पालखी उत्सवाला परवानगी नाकारल्यामुळे जय बाभळेश्वर सामाजिक प्रतिष्ठानची कावड रद्द करण्यात आली आहे. रेणूका नगरस्थित मंदिर परिसरात शिवभक्तांना गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


श्रावण महिन्यात शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या जलाने जलाभिषेक करण्याची परंपरा आहे. शेवटच्या सोमवारी कावड व पालखी उत्सव साजरा करण्यात येतो.  यामध्ये जय बाभळेश्वर सामाजिक प्रतिष्ठान तर्फे कावड काढण्यात येते. ज्यामध्ये हजारो शिवभक्त सहभागी होत असतात. 



कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता बघता स्थानिक जिल्हा प्रशासन कडून यावर्षी केवळ श्री राजेश्वराच्या मानाच्या पालखीला परवानगी देण्यात आली आहे. इतर कुठल्याही पालखी - कावडला परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनकडून प्राप्त निर्देशाचे पालन करीत जय बाभळेश्वर प्रतिष्ठान तर्फे कावड काढण्यात येणार नाही. 



बाभळेश्वर या कावड मध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक शिवभक्तांनी निर्देशाचे पालन करावे. त्यामुळे शिवभक्तांनी रविवार  ५ सप्टेंबर रोजी जय बाभळेश्वर चौकातील मंदिराच्या प्रांगणात गर्दी न करण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती जय बाभळेश्वर प्रतिष्ठान (अकोला) तर्फे अमोल इंगळे यांनी दिली आहे.

टिप्पण्या