Indian festival:Pola utsav:Akola: पोळा हा सण प्रत्येक शेतकऱ्यांनी घरीच साजरा करावा - जिल्हाधिकारी निमा अरोरा


शासनाच्या आदेशाचे सर्व शेतकऱ्यांनी पालन करावे.-माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : पोळा चौक,जुने शहर अकोला येथे दरवर्षी साजरा होणारा शेतकरी सन्मान सोहळा तथा उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धा हा कार्यक्रम यावर्षी वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता  प्रत्येक शेतकऱ्याने हा सण आपापल्या घरी साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.




यावेळी माजी आमदार प्रा तुकाराम बिडकर यांच्या नेतृत्वात अकोला महानगर पोळा चौक येथील शेतकरी सन्मान सोहळा व उत्कृष्ट बैल सजावट स्पर्धेचे आयोजक अनिल मालगे, जुने शहरातील कास्तकार गजानन वानखडे ,गोपाल मांडेकर, ऍड. लखन बडदिया, सुरेश भिरड, शेख नजीर  राजु खान, प्रा. सदाशिव शेळके, अनिल कुटाफळे, प्रमोद वानखडे, रामेश्वर वानखडे , दिलीप भगत, राजेंद्र गोतमारे, रवि भाकरेआदीनी जिल्हाधिकारी यांनी पोळा सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते. 




 

"यावर्षी पोळा चौक जुने शहर अकोला येथे कोणीही आपल्या बैलजोड्या घेऊन न येता व पोळा चौक जुने शहर अकोला येथे गर्दी न करता हा सण आपल्या आपल्या घरी साजरा करावा." 

 

अनिल मालगे 

आयोजक

शेतकरी सन्मान सोहळा व शेतकरी उत्कृष्ट बैलजोडी सजावट स्पर्धा.




टिप्पण्या