Highest rainfall:Akola:Murtijapur: अतिवृष्टी: मूर्तिजापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद; एरंडात भिंत कोसळून एक ठार, जाणून घ्या तालुकानिहाय पावसाची स्थिती...

Heavy rains at Akola: Highest rainfall recorded in Murtijapur taluka;  Overcast in six circles




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: कालपासून अकोला जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे.रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी नाल्याना पूर आला आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. एरंडा येथे  भिंत कोसळुन वृद्ध शामराव पवार यांचा मृत्यु झाला. तर काटेपुर्णा नदीमध्ये दोन युवक वाहून गेले. पूर्णा नदीला पूर आल्याने अकोट-अकोला मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. दरम्यान, अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुका येथे सर्वाधिक पाऊस झाला आहे. मुर्तिजापूर तालुक्यात आज 81.9 एम.एम. सरासरी पाऊस झाला असून तालुक्यातील सहा मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.



"जिल्ह्यात सोमवार 6 चे रात्री पासुन ते आज मंगळवार 7 सप्टेंबरचे सकाळपर्यंत सर्व तालुक्यातील प्राप्त प्राथमिक अहवालानुसार मुर्तिजापूर तालुक्यातील सहा मंडळामध्ये अतिवृष्टीची झाली आहे."  


मुकेश चव्हाण

निवासी उपजिल्हाधिकारी 




तालुकानिहाय पावसाची नोंद 


मुर्तिजापूर तालुक्यात आज 81.9 एम.एम. सरासरी पाऊस झाला असून तालुक्यातील सहा मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात निंभा येथे 75.8, माना 90.8, शेलु 120.8, लाखापुरी 76.8, कुरुम 98.3, जामठी 92 एम.एम.  पाऊस झाला असून तालुक्यातील सर्व नदी नाल्यांना पुर आहे. परंतु कोणत्याही गावांचा संपर्क तुटलेला नाही. 



अकोला तालुक्यात आज 50.2 एमएम सरासरी पाऊस  झाला असून तालुक्यातील सर्व नदी नाल्यांना पुर आहे. परंतु कोणत्याही गावांचा संपर्क तुटलेला नाही. सद्यास्थितीत पाऊस थांबलेला आहे. तसेच सोमवार दि. 6 रोजी काटेपुर्णा नदीमध्ये  दोन मुले वाहून गेले. 



बार्शिटाकळी तालुक्यात आज 50.9 एमएम सरासरी पाऊस झाला असून तालुक्यातील सर्व नदी नाल्यांना पुर आहे. परंतु कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही. राजंदा मंडळामध्ये 80.5 एमएम पावसाची नोंद झाली आहे. तसेच मौजे एरंडा येथे रात्री झालेल्या पावसामुळे भिंत कोसळुन 70 वर्षीय शामराव आप्पा पवार  यांचा मृत्यु झाला.


अकोट तालुक्यात 39.5 एमएम. सरासरी पावसाची नोंद झाली असून सर्व नदी नाल्यांना पुर आहे. परंतु कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही. तसेच तालुक्यातील आसेगांव बाजार व वरुर येथे काही घरांमध्ये गावाजवळील नाल्याचे पाणी गेले आहे त्याबाबत पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु आहे. तेल्हारा तालुक्यात 16.3 एमएम. सरासरी पावसाची नोंद झाली असून सर्व नदी नाल्यांना पुर आहे. परंतु कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही.


बाळापुर तालुक्यात 26.1 एमएम. सरासरी पावसाची नोंद झाली असून  बाळापुर मंडळामध्ये 71.3 एमएम व व्याळा मंडळामध्ये 76 एमएम पावसाची नोंद झाली आहे. तसेच कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही. 



पातुर तालुक्यात 41.9 एमएम. सरासरी पावसाची नोंद झाली असून सर्व नदी नाल्यांना पुर आहे. परंतु कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही, असा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाव्दारे विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

टिप्पण्या