Heavy rains: सर्तकतेचा इशारा: महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार: विदर्भाला दिला यलो अलर्ट; अकोल्यात हलका ते मध्यम पर्जन्यमान

Warning: Heavy rains to fall in Maharashtra: Yellow alert issued to Vidarbha;  Light to moderate rainfall in Akola




 



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला:  हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार शुक्रवार 10 सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत अकोला जिल्ह्यामध्ये हल्का ते मध्यम स्वरुपाचे पर्जन्यमान व एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तविलेली आहे.




नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदी, नाले, ओढे इत्यादी ठिकाणी पाऊस सुरु  असतांना किंवा पूर परिस्थिती असतांना पूर पाहण्यास गर्दी करु नये. पुलावरुन पाणी वाहत असतांना दुचाकीने किंवा प्रत्यक्ष जाण्याचे टाळावे. नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याच्या अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देण्यात यावा. तसेच  संबंधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थितीत राहुन योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.




संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार 


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र  तीव्र होत आहे. तसेच पूर्व पश्चिम वाऱ्यांचा वेग चांगला असल्याने दक्षिणेसह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. 




कमी दाबाचे क्षेत्र चक्रीय स्थितीत रुपांतर होत असल्याने विदर्भात आजपासून पुढील दोन-चार दिवस मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविली आहे.



कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सुद्धा येत्या  चार-,पाच दिवस चांगला पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तविली आहे.




उत्तर कोकणात जोरदार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तविली आली आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. 7 आणि 8 सप्टेंबर रोजी उत्तर कोकणातील काही भागात अतिवृष्टीची होण्याची शक्यता आहे. 



मध्य महाराष्ट्रातील 8 सप्टेंबर रोजी काही भागात अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आजसाठी मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 7 आणि 8 सप्टेंबर रोजी अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात पुढील 3 दिवस देखील मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मुंबईसह अनेक ठिकाणी यलो अलर्ट आहे तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे.



उत्तर मराठवाडा मध्ये 7 सप्टेंबर ते 9 सप्टेंबरपर्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधारेचा इशारा हवामान विभागाकडून वर्तविला आहे. विदर्भात येत्या दोन ते तीन दिवस धुवांधार पावसाची शक्यता आहे. संपूर्ण विदर्भाला यलो अलर्ट देण्यात आला आहे. 





टिप्पण्या