Education: scientific attitude: छोट्या गोष्टींमधून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे आवश्यक- डॉ सुचिता पाटेकर

It is necessary to inculcate scientific attitude in students through small things- Dr. Suchita Patekar




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: शिक्षणाधिकारी माध्यमिक अकोला जिल्हा, जिल्हा मुख्याध्यापक संघ अकोला, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ अकोला अकोला एज्युकेशन सोसायटी अकोला यांचे संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अकोला येथे सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. सहविचार सभेमध्ये विज्ञान विषयक विविध उपक्रम यामध्ये इंस्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनी तसेच इंस्पायर अवार्ड नॉमिनेशन व विज्ञान दिनदर्शिका याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली सभेला अकोला जिल्ह्यातील विज्ञान शिक्षक जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक व विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच विज्ञान प्रेमी व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



सभेचे अध्यक्षस्थान अकोला एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव प्रा.श्रीकृष्ण अमरावतीकर यांनी भूषविले. याप्रसंगी त्यांनी शिक्षकांचे महत्त्व विद्यार्थी जीवनासाठी किती महत्वाचे आहे, हे विशद केले.



शिक्षकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन



नव्याने रुजू झालेल्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक अकोला) डॉ. सुचिता पाटेकर   या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शका होत्या. त्यांनी आपल्या विचारांमधून विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा द्यायची असेल तर छोट्या छोट्या प्रयोगांमधून कशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा तसेच शिक्षकांनी आपले शैक्षणिक कार्य आनंदाने आणि उत्साहाने कशा प्रकारे पूर्ण करावे हे  स्वतःच्या अनुभवातून सांगितले तसेच शैक्षणिक कार्याला नवीन दिशा देण्यासाठी ॲस्ट्रॉनॉमी क्लब, वाइल्डलाइफ क्लब, स्थापन करणे व विज्ञान दिनदर्शिका तयार करण्यावर भर दिला. व या संदर्भामध्ये शिक्षकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.



सभेला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले  दिलीप तायडे (शिक्षणाधिकारी निरंतर) यांनी इंस्पायर अवार्डचे महत्व पटवून दिले. तसेच स्पर्धा परीक्षा विद्यार्थी जीवनामध्ये कशाप्रकारे महत्त्वाचे आहेत ते सांगितले.




विभागीय तसेच जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांनी उपस्थित शिक्षकांना आपल्या प्रास्ताविक  मधून विज्ञान विषयक सहविचार सभे विषयी  सविस्तर माहिती विशद केली. तसेच इंस्पायर अवार्ड करिता मॉडेल कशाप्रकारे असावे व ते तयार करण्या संदर्भामध्ये कुठल्या प्रकारची काळजी घ्यावी याविषयी सखोल मार्गदर्शन केले.




सभेला विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष  शत्रुघ्न बिडकर, मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी बळीराम झांमरे,विजय ठोकळ , सर्जेराव देशमुख,दीलीप कडू, कल्पना  धोत्रे, प्राचार्य माधव मुंनशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.



सहविचार सभेच्या दुसऱ्या सत्रामध्ये शशिकांत बांगर व सुरेश बाविस्कर यांनी इंस्पायर अवार्ड नामांकन ऑनलाइन कसे करायचे व त्यामध्ये येणाऱ्या अडचणी कशाप्रकारे दूर कराव्या या संदर्भामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले. 



याप्रसंगी विज्ञान मंडळाचे पदाधिकारी देवानंद मुसळे, अनिल जोशी, ओरा चक्रे,रामेश्वर धर्मे, एस आर निखाडे,  विजय पजई, सुरेश किरतकर,  विश्वास जढाळ, सुनील वावगे, धर्मदीप इंगळे , विनोद देवके,  संतोष जाधव, मनीष निखाडे, मुरलीधर थोरात, आशा ताडे, विकास भवाने, प्रमोद पांडे, नितीन गायकवाड, पंकज देशमुख , माणिक गायकी, विलास घुंगड , प्रभू चव्हाण, रवींद्र जायले, प्रमोद तसरे, शंकर घुगे, अजय मगर, रेखा सानप, वंदना उमरकर, सोनीया फिलिप्स, सविता पवार , रेवती अयाचित, किर्ती देशमुख, शुभांगी कुरे किरण राठोड ,अंजली दंडे उपस्थित होत्या .                                   

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा