Cabinet Decision:मंत्रिमंडळ निर्णय: राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदेत बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय; अध्यादेश काढण्यात येणार

Cabinet Decision: Decision to re-implement the provision of multi-member wards in the Municipal Corporations and Municipal Councils of the State.





मुंबई: राज्यातील महानगरपालिका व नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून, यासंदर्भातील अध्यादेश प्रख्यापित करण्यासाठी राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येणार आहे. 




पुढील वर्षाच्या सुरुवातीला होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत तीन सदस्यांचा एक प्रभाग असेल. मुंबई महापालिकेत आधीचीच एक सदस्य प्रभाग पद्धत कायम असेल. तर नगरपालिकांमध्ये दोन तर नगर पंचायतीमध्ये एक सदस्य प्रभाग पद्धत लागू असेल. यासंदर्भात अध्यादेश काढण्यात येणार आहे.


बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीसाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. 



कोरोनामुळे निर्माण झालेली आरोग्य विषयक परिस्थिती हाताळताना निदर्शनास आलेल्या बाबी तसेच लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणलेली वस्तुस्थिती यामुळे नागरी समस्यांचे निराकरण, जबाबदारी पार पाडणे निर्वाहन हे प्रभागात सामूहिक प्रतिनिधित्वांमुळे अधिक उचित पध्दतीने होऊ शकते. या बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील संबंधित कलमात सुधारणा करुन महानगरपालिका साठी बहुसदस्यीय प्रभागाची तरतूद पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.


त्यानुसार महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर तीन पालिका सदस्य, परंतु, दोनपेक्षा कमी नाहीत आणि चारपेक्षा अधिक नाहीत. इतकी सदस्य संख्या निर्धारित करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली.


मुदत संपलेल्या महापालिका


नवी मुंबई

कल्याण-डोंबिवली

औरंगाबाद

वसई-विरार

कोल्हापूर


२०२२ मध्ये निवडणूक होणार्‍या महापालिका

मुंबई

ठाणे

उल्हासनगर

नाशिक

पुणे

पिंपरी-चिंचवड

सोलापूर

नागपूर

अमरावती

अकोला


सदस्यीय प्रभाग पद्धत

मुंबई - १

अन्य महापालिका- ३

नगरपालिका- २

नगरपंचायत- १

टिप्पण्या