Bharat Bandh: भारत बंदला संमिश्र प्रतिसाद; अकोल्यात नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा, नाना भाऊंनी स्वतः चालविला ऑटोरिक्षा,काँग्रेसच्या नेत्यांची व्यापाऱ्यांवर दादागिरी-अकोला भाजप

Mixed response to Bharat Bandh; Protest march led by Nana Patole in Akola, Nana Bhau drove autorickshaw and motorcycle himself




ठळक मुद्दे


*केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी लादलेले तीन काळे कृषी कायदे, कामगारविरोधी कायदे, वाढती बेरोजगारी, महागाईचा निषेध करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली अकोला येथे भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. 



*कॉंग्रेस तर्फे आयोजित अकोला येथे भारत बंदच्या रैली मध्ये अटोरिक्षा चालवून नाना पटोले यांनी सहभाग घेतला. 


*काँग्रेसच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांवर दादागिरी व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला-भाजप


*काँग्रेस मधील अंतर्गत गटबाजीचे प्रदर्शन


नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा (BA news24)



ॲड.नीलिमा शिंगणे-जगड


अकोला: संयुक्त किसान मोर्चाने नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात आज 27 सप्टेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदने सकाळ पासूनच दिल्ली, हरियाणा, पंजाब आदी प्रांतात आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली. तर आंध्रप्रदेश, केरळ, राजस्थान, कर्नाटक ,अमृतसर, बिहार आदी ठिकाणी बऱ्या पैकी प्रतिसाद लाभला. मात्र, महाराष्ट्रात भारत बंद ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने आंदोलकांमध्ये तारांबळ उडालेली दिसली.



नाना पटोले यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा 

दरम्यान, विदर्भातील अकोला येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढण्यात आला. यामध्ये नाना पटोले यांनी स्वतः मोटारसायकल चालविली. तसेच या मोर्चात आटोरिक्षा चालक मालक संघटनांनी सहभाग घेतला. यावेळी ऑटोरिक्षा चालकांच्या समर्थनार्थ नाना पाटोले यांनी स्वतः ऑटोरिक्षा चालवून ऑटोरिक्षा चालक व मालक यांना पाठिंबा दिला. कोरोना लॉकडाउन काळात आटोरिक्षा चालकांवर बेरोजगारी व उपासमारीची वेळ आली आहे.यामुळे या बंद मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीचे समर्थन करीत मोर्चात सहभाग घेतला.


जगाचं पोट भरणाऱ्या अन्नदात्यावर लाठ्याकाठ्या चालवणाऱ्या, त्याच्या हक्काच्या शेतात त्याला मजूर बनवून आपल्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी काळे कृषी कायदे लादणाऱ्या जुलमी-अत्याचारी मोदी सरकार विरोधात भारत बंद करण्यात येत असल्याचे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले. 

लढा भविष्यासाठी...शेतकऱ्यांच्या हक्कासाठी... अशी हाक पटोले यांनी यावेळी नागरिकांना दिली.



बुलडाणा येथे निषेध मोर्चा



केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी लादलेले तीन काळे कृषी कायदे, कामगारविरोधी कायदे, वाढती बेरोजगारी, महागाईचा निषेध करण्यासाठी बुलढाणा येथे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला. 






दिल्ली-गुरुग्राम सीमेवर प्रचंड जाम 



सोमवारी सकाळी दिल्ली-गुरुग्राम हायवेवर शेकडो गाड्यांची लांबच-लाब रांग दिसत होत्या. आंदोलक शेतकऱ्यांनी सकाळ पासून हा मार्ग बंद केला होता.  



गाझीपूर सीमेवर देखील शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेस वे बंद केला. NH 24 आणि NH 9 दोन्ही ब्लॉक करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी सकाळीच ट्वीट करुन या जामबद्दल सामान्य नागरिकांना सतर्क होते. यूपी ते गाझीपूरपर्यंतची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी तातडीने दिली होती.




भारत बंदमुळे नागरिकांना त्रास 


दिल्ली-गुरुग्राम सीमेवर सकाळपासून झालेल्या ट्रॅफिक जाममुळे कार्यालयात जाणारे लोक वाटेतच अडकले होते. कारच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. काहींनी परत जाणे पसंद केले.तर काही रस्ता मोकळा व्हायची वाट पाहिली. काही माधातच अडकल्यामुळे ट्राफिक मोकळी होईपर्यंत ताटकळत बसले. केएमपी एक्सप्रेस वेवर शेतकरी बसल्याने.  पोलिसांनी एक्स्प्रेस वे बंद केला होता. याशिवाय लाल किल्ल्याकडे जाणारे दोन्ही मार्ग बंद केले होते.



ररस्त्यावर झोपले आंदोलक


हरियाणाच्या कुरुक्षेत्रातील शहाबाद परिसरात आंदोलक शेतकर्‍यांनी रस्त्याच्या मधोमध गाद्या टाकून त्यावर झोपून रस्ता अडवला. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला होता. शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे या मार्गावर देखील ट्रकच्या लांब रांगा लागल्या होत्या.



महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद


जाचक कृषी कायद्यांविरोधात मागील अनेक महिने आंदोलन करीत असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने सोमवारी 'भारत बंद' ची हाक दिली. या बंदला महाराष्ट्रात विविध शेतकरी संघटनांबरोबरच काँग्रेस, आम आदमी पक्षासह अनेक विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.


वाढती महागाई, शेतकरी विरोधी तीन काळे कृषी कायदे आणि सरकारी कंपन्यांचे करण्यात येत असलेले खासगीकरण या विरोधात केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी सोमवार, 27 सप्टेंबरला शेतकरी संघटना आणि डाव्या संघटनांकडून 'भारत बंद' पुकारला आहे. या बंदमध्ये काँग्रेसने सक्रिय सहभाग नोंदविला.


देशवासीयांना खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपच्या हुकूमशाही राजवटीने आणलेले शेतकरीविरोधी तीन काळे कायदे, रेल्वे, बँका, विमानसेवा, रस्ते, विमा कंपन्या, सार्वजनिक उद्योग, दूरसंचार, बंदरे आदींचे होत असलेले खासगीकरण, दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई आणि बेरोजगारी यांच्या विरोधात केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटना, सर्व डाव्या आघाडींनी 'भारत बंद' चे आवाहन केले होते. मुंबई काँग्रेसने आंदोलनाला पाठिंबा दिला भाजपच्या हुकूमशाही व कपटी राजवटीचा निषेध मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप  यांच्या मार्गदर्शन मध्ये करण्यात आला.



कापड बाजार बंद

दरम्यान किसान आंदोलन समितिने पुकारलेल्या भारत बंदला अमरावती मधील बिजी लैंड, सिटी लैंड, ड्रीमलैंड या तिन्ही मार्केटने संयुक्त निर्णय घेवून सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद मध्ये सहभाग घेतला होता. बिजी लैंड व्यापारी सामाजिक संघटन, सिटी लैंड सोशल वेलफेयर एसोशिएशन, ड्रीम लैंड एसोसिएशन सहभागी झाली होती.



काँग्रेस मध्ये अंतर्गत गटबाजी 


अकोल्यात नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली भारत बंद निषेध रॅली काढण्यात आली.मात्र नियोजन अभावी रॅलीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. काँग्रेसचे बडे नेतृत्व शहरात असूनही काँग्रेस मधील आंतरिक कलह यावेळी देखील दिसून आला.केवळ एका गटाचे समर्थक या मोर्चात सहभागी झाले होते. अन्य आघाडी सेल चे पदाधिकारी वा कार्यकर्ते दिसून आले नाही. सकाळी 9 वाजता निघणारी रॅली साडे बारा एक वाजता निघाली. यामुळे काँग्रेस मध्ये गटबाजी मुळे ताळाला मेळ नसल्याचे परत एकदा या रॅलीमुळे दिसून आले.



दरम्यान,शहरातील मुख्य बाजारपेठ सह इतर भागातील तुरळक दुकाने बंद होती.बाकी दुकाने नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे दिसून आले.



काँग्रेसच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांवर दादागिरी व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला


अकोला: काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सह 29 पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी पाठिंबा न देता दैनंदिन कारभार सुरळीतपणे चालू करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सबका साथ सबका विकास सबका विश्वास या दृष्टीने वाटचाल करीत असल्याचा व शेतकऱ्यांच्या हितार्थ कृषी विधेयक असल्याचा दाखला दिला आहे. 



एकीकडे कोर्टाने कायद्याला स्थगिती दिल्यानंतर सुद्धा केवळ राजकीय फायद्यासाठी व कायदा अस्तित्वात नसतानासुद्धा केवळ भाजपाला बदनाम करण्याच्या दृष्टीने काँग्रेस शिवसेना व किसान युनियन यांची वाटचाल सुरू आहे. दिल्लीचे बॉर्डरवर उपोषण करून देशात मोदी सरकार विरुद्ध गोदी मीडिया व भाजप द्वेषाने देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे वेगवेगळे प्रश्न घेऊन वेगवेगळे मुखवटे घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाच्या विरोधात आंदोलन करत आहे. परंतु जनतेचा विश्वास यांच्यावर बसताना सुद्धा केवळ राजकीय फायद्यासाठी जन आंदोलन करण्यात येत आहे आज भारत बंद पूर्णपणे अयशस्वी करून जनतेनी भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार  हरीश पिंपळे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल तेजराव थोरात श्रीकृष्ण मोरखडे कुसुमताई भगत व चंदाताई शर्मा सचिन देशमुख उमेश गुजर यांनी जनतेचे आभार व अभिनंदन केले आहे. 



काँग्रेसच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांवर दादागिरी व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु व्यापारी व पोलिसांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला याबद्दल सुद्धा प्रशासनाचे व्यापाऱ्यांचे तसेच मातृशक्ती युवाशक्ती व ज्येष्ठ नागरिकांचे अभिनंदन करून आपल्या दैनंदिन कारभार सुरू ठेवून न घाबरता रस्त्यावर येऊन व्यापाऱ्यांचे व नागरिकांचे संरक्षण व समर्थन केले असल्याचे अकोला भाजपने म्हंटले आहे.









टिप्पण्या