Akola court: prisoner,marijuana: कारागृहात चप्पल मधून गांजा नेणाऱ्या कैद्याला एक वर्षाचा सश्रम कारावास

prisoner carrying marijuana through slippers has been sentenced to one year rigorous imprisonment  (photo:Akola court)




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: अकोला मध्यवर्ती कारागृह येथे एका गंभीर गुन्ह्यात बंदिस्त असलेला आरोपी विष्णू पुणालाल पोरवाल याने कारागृहात गांजा नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी  शिल्पा बैस यांनी आरोपीला दोषी ठरविले व एक वर्षाच्या सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावली.



काय आहे प्रकरण


अकोला कारागृहात विष्णू पोरवाल व लक्ष्मीकांत चव्हाण हे दोन आरोपी वेगवेगळ्या गुन्ह्यात बंदिस्त होते. 12 फेब्रुवारी 2020 रोजी या दोन्ही आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर कारागृहात परत येताना यातील आरोपी विष्णू पोरवाल याने चप्पलमध्ये गांजा आणला होता. चप्पल घालून कारागृहात जात असताना कारागृहाचे चेकिंग अधिकारी विजय इंगळे यांना संशय आल्याने त्यांनी आरोपीला थांबविले. आरोपीच्या चप्पल तपासली असता त्यामध्ये काही आक्षेपार्ह वस्तू असल्याचे दिसले. यानंतर विजय इंगळे यांनी गेट इन्चार्ज सुभेदार भगवान लाखे यांना याबाबत माहिती कळविली. जेल कर्मचाऱ्यांनी आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून 47 ग्राम गांजा मिळून आला. याबाबतची तक्रार कारागृह अधीक्षकांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल केली. पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी या प्रकरणात फिर्यादी बनवून आरोपीविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा दाखल केला. 




या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या सरकारी वकील मीनाक्षी बेलसरे यांनी सरकारच्या वतीने हा खटला चालवला. या खटल्यात पोलीस निरीक्षक विलास पाटील, घटनास्थळाचा पंच शैलेश भराटे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपी विष्णू पूनालाल पोरवाल याच्याविरुद्ध आरोप सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने त्याला एक वर्षाचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

टिप्पण्या