Akola city: Commissioner: Kavita Dwivedi: अकोल्याची कमान आता कर्तृत्ववान महिलांच्या हाती; अकोला मनपा आयुक्तपदी आयएएस कविता द्विवेदी


The bow of Akola is now in the hands of capable women;  IAS Kavita Dwivedi as Akola Commissioner





ॲड.नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: महानगरपालिका अकोलाचे आयुक्तपद मागील काही महिन्यांपासून रिक्त होते. आता मात्र अकोलेकरांची प्रतीक्षा संपली असून, मनपा आयुक्तपदी शासनाने आज एका आदेशानव्ये आयएएस कविता द्विवेदी यांची नियुक्ती केली आहे. द्विवेदी यांच्या रूपाने अकोला मनपाला दुसऱ्या आयएएस महिला आयुक्त मिळाल्या आहेत. तर विद्यमान अकोला जिल्हाधिकारी नीमा अरोरा या पहिल्या ठरल्या होत्या. यानिमित्त अमरावती जिल्हानंतर अकोला मध्येही महिला राज अवतरणार आहे.



नवनियुक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी पदभार स्विकारला नंतर अकोल्याची कमान कर्तृत्ववान महिलांच्या हाती असणार आहे.अकोला जिल्हाधिकारी आयएएस नीमा अरोरा तर जिल्हापरिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, अकोला मनपा महापौर अर्चना मसने अश्या या कर्तृत्ववान महिलांच्या हाती कमान राहील. मात्र, त्यांनी अकोला विकास कामांचा शिवधनुष्य पेलावा, अशी अपेक्षा सामान्य अकोलेकरांनी व्यक्त केली.



दरम्यान,अकोला मनपा आयुक्त पदाचा प्रभार जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्याकडेच आहे. मात्र आता अकोला मनपा आयुक्तपदी कोण या चर्चेला विराम मिळाला आहे. सध्या कविता द्विवेदी या AMC PMRDA पुणे येथे कार्यरत आहेत. शासनाच्या एका आदेशाद्वारे त्यांची अकोला मनपा आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. 



काही दिवसांपूर्वी आयएएस अधिकारी वर्गाच्या बदलीचे आदेश निघाले होते. यामध्ये मनपा आयुक्त निमा अरोरा यांना अकोला जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची अकोला महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. मात्र,पापळकर यांनी काही कारणास्तव मनपा आयुक्तपद स्वीकारण्यास नकार दिला होता. तात्काळ मुंबई गाठून दुसरीकडे बदली करण्याची विनंती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती. 




यानंतरच्या बदली सत्रात पापळकर यांना हिंगोली जिल्हाधिकारी पद देण्यात आले.  तेव्हापासून अकोला महापालिका आयुक्त हे पद रिक्तच होते. लवकरच नवीन महापालिका आयुक्त कविता द्विवेदी या पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.




बदली झालेल्या अधिकारी वर्गाची यादी


1)Shri N.K.Patil, MD, Maharashtra State Co.Op.Tribal Development Corporation has been transferred to Commissioner Manav Vikas, Aurangabad.


2)Dr. C.L.Pulkundwar, Joint MD, MSRDC has been transferred to Director, Disaster Management, R & FD Mantralaya.


3)Kavita Dwivedi AMC, PMRDA Pune has been transfer to Municipal Commissioner Akola


4)Dipak Singla,MS. Vidarbha Statutory Development Corporation Nagpur


5)Bhagyashree Banaiet, Director,  Reshim, Nagpur has been transfer to CEO Sai Baba Sansthan, Shirdi


6)L. S. Mali, Director Disaster Management has been transfer to Secretary, Shulk Niyamak Pradhikaran


7)Pradip Kumar Dange has been transfer to MD, Mahatma Jyotiba Phule (Mahajyot), Nagpur 


8)Jayashree Bhoj MD MTDC, Mumbai additional Charge Maharashtra IT Corporation Mumbai


टिप्पण्या