- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Agitations against gas price hike: गॅस दरवाढ विरोधात आंदोलन: मोदी सरकारला राकॉने पाठविल्या पोस्ट द्वारा गवऱ्या
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: दिवसेंदिवस गॅस सिलेंडरच्या दरवाढ विरोधात केंद्र सरकारवर निशाणा साधत वेगवेगळ्या पद्धतीने देशभरात निषेध नोंदवला जात आहे. अकोल्यातही गॅस दरवाढ निषेधार्थ एक हटके आंदोलन करून सर्वांचे लक्ष या मुद्द्याकडे वेधण्याचा प्रयत्न केला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून चक्क शेणाच्या गवऱ्या पाकिटात टाकून पार्सल पोस्ट करून गॅस दरवाढ विरुद्ध आंदोलनात निषेध व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने गॅस दरवाढ आणि वाढत्या महागाई विरुद्ध हे आंदोलन मोठे पोस्ट ऑफिस समोर करण्यात आले. आंदोलनात केंद्र सरकार विरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली. तसेच गॅस दरवाढी निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टद्वारे शेणाच्या गवऱ्या पाठवण्यात आल्या. सोबत एक पत्र लिहून या भेटीचा स्वीकार करावा,अशी विनंती देखील करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या निर्देशानुसार अकोला शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉग्रेस अध्यक्षा रिजवाना शेख अजीज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात स्थानिक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा