Weather Forecast: पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात विज व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; 29 व 30 ऑगस्ट रोजी अकोल्यात अतिवृष्टीचा इशारा



Weather Forecast: Chance of thunderstorm in Western Maharashtra, Vidarbha, Marathwada;  Heavy rains in Akola on August 29 and 30!





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : प्रादेशिक हवामान विभागाने येत्या पाच दिवसांसाठी महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या पाच दिवस पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. तर राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विटद्वारा आज दिली केले आहे.


महाराष्ट्रात आज प्रामुख्याने पूर्व विदर्भाला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट दिला आहे. या ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याची शक्यता आहे. 




तर 28 ऑगस्ट रोजी वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यासाठी यलो अ‌ॅलर्ट दिला आहे. तसेच राज्यात इतर जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. 




29 व 30 ऑगस्ट रोजी राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोली या ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मध्यन्तरी पावसाने उघडीप दिली होती. आता मात्र 3 सप्टेंबर पर्यंत राज्यात पाऊस मुक्कामी असल्याचे चिन्ह दिसत आहेत.



पर्जन्यमान: अकोला

घुंगशी ब्यारेज-दि 27/08/21 रोजी सकाळी 6.00 वा ,सध्या पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे ब्यारेज ची सर्व व्दारे वर उचलून ठेवण्यात आली आहेत नदीपात्रात तीन गेट मधून पाणी वाहत आहे पाण्याची पातळी 253.30 मी असुन पाणी विसर्ग 21.75 घमीप्रसें आहे.

टिप्पण्या