VBA: आमदार नितीन देशमुख आणि बी डी ओ शेळके यांच्या विरोधात वंचितचे आत्मक्लेश आंदोलन सुरू

MLA Nitin Deshmukh and BDO Shelke's against the vanchit self-torture agitation started




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: पातूर तालुक्यातील पिंपळखुटा संपूर्ण ग्रामपंचायतने तीन दिवसापासून पातूर पंचायत समिती समोर आंदोलन सुरू केले आहे. स्थानिक आमदार व बी डी ओ शेळके यांनी ग्रामपंचायत सदस्यची दखल  न घेता त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आंदोलनकर्त्या महिला तीन रात्री पासून रस्त्यावर आहेत. तरीसुद्धा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी संवेदनशीलता दाखवत नाही. यासाठी आज 25 ऑगस्ट सायंकाळ 7 पासून वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे पातूर बी डी ओ यांच्या कक्षात संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ सोबत आत्मक्लेश आंदोलनाला ठाण मांडून बसले आहेत.



 

डॉ. पुंडकर यांच्यासह वंचीत बहुजन आघाडीचे डॉ ओमप्रकाश धर्माळ , निर्भय पोहरे ,चरणसिंग चव्हाण, पराग गवई , अविनाश खंडारे, राहुल सदार, शिवाजी काळे, पंचायत समिती सदस्य राणा , स्वप्नील सुरवाडे  व शेकडो नागरिक आंदोलनात सहभागी झाले आहेत.



कशासाठी हे आंदोलन


गेल्या सात महिन्यांपासून पिंपळखुटा येथे कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने ग्रामसेवकाची नियुक्ती करण्याची मागणी करीत सरपंच, उपसरपंच, सदस्य तथा महिला गावकऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी पंचायत समिती, पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष अकोला यांच्याकडे मागणी केली होती. मात्र निवेदनाची दखल न घेतल्यामुळे महिलांनी पंचायत समिती समोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.



आमदार नितीन देशमुख यांनी दिले आश्वासन


दरम्यान आ. नितीन देशमुख यांनी उपोषण स्थळाला भेट दिली व ग्रामस्थांना उपोषण स्थगित करण्याचे आवाहन करून मागणी लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मात्र, जोपर्यंत ग्रामसेवक मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार, अशी आक्रमक भूमिका पिंपळखुटा येथील महिलांनी घेतल्याने उपोषण सुरुच ठेवले. आमदार देशमुख यांनी आद्यपही यासंदर्भात ठोस कारवाई केली नाही. आमदारांनी दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे. 

टिप्पण्या