- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Tokyo olympics 2020: भारतीय पुरुष हॉकी संघाने १९७२ नंतर पहिल्यांदा उपांत्य सामन्यात दिली धडक: पी. व्ही. सिंधूने इतिहास रचला; पंतप्रधान मोदींनी केलं कौतूक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
क्रीडांगण
ॲड. नीलिमा शिंगणे-जगड
अकोला
टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये आज १ ऑगस्ट भारतासाठी खूपच महत्वाचा ठरला आहे. महिला बॅडमिंटनमध्ये एकेरी गटातील कांस्य पदकाच्या सामन्यात भारतीय स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने इतिहास रचला. तिने या ऑलिंपिक्समध्ये भारतासाठी दुसरे पदक जिंकून दिले. तर पुरुष हॉकी खेळात उपांत्यपूर्व सामन्यात भारताने ग्रेट ब्रिटनला ३-१ ने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे १९७२ नंतर भारताने पहिल्यांदा उपांत्य सामन्यात धडक दिली आहे.
या सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये सुरुवातीलाच भारताकडून दिलप्रीत सिंगने ७ व्या मिनिटाला शानदार फील्ड गोल करत भारताला १-० ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या हाफ मध्ये १६ व्या मिनिटाला गुर्जंत सिंगने गोल केला. भारताला २-० ने आघाडी मिळाली.
त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या क्षणी ग्रेट ब्रिटनने एक गोल करत भारताविरुद्ध शानदार पुनरागमन केले. ग्रेट ब्रिटनसाठी वॉर्डने पेनल्टी कॉर्नरमध्ये मिळालेल्या चेंडूमार्फत गोल केला. मात्र सामन्यात भारत २-१ ने पुढेच होता.
विशेष म्हणजे सामन्याच्या अंतिम क्षणी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगला येलो कार्ड दाखवण्यात आले. त्यामुळे तो मैदानातून बाहेर गेला होता. त्याला ५ मिनिटांसाठी मैदानातून बाहेर राहावे लागले. त्यामुळे भारताचे १० खेळाडूच खेळत होते. यानंतर हार्दिक सिंगने सामन्याच्या ५७ व्या मिनिटाला मैदानी गोल केला. त्यामुळे भारताने ३-१ ने आघाडी घेत सामना जिंकला. आता भारतीय संघ उपांत्य सामन्यात बेल्जियम संघाचा सामना करेल.
1980 मध्ये सुवर्ण पदक
भारताने 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिक मध्ये शेवटचे ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. पण तेव्हा फक्त सहा संघ सहभागी झाले होते आणि सुवर्णपदक स्पर्धा अव्वल दोन संघांमध्ये राउंड रॉबिन तत्वावर होती. अशाप्रकारे भारताने 1972 च्या म्युनिच ऑलिम्पिक नंतर प्रथमच उपांत्य फेरी गाठली आहे.
पीव्ही सिंधूनं इतिहास रचला
बॅडमिंटनच्या कांस्य पदकाच्या सामन्यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने इतिहास रचला आहे. सिंधूने एकेरी गटात चीनच्या बिंगजियाओला २१- १३, २१-१२ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केले. या विजयामुळे सिंधूने कांस्यपदक आपल्या नावावर केले आहे. विशेष म्हणजे असा ऑलिम्पिक मध्ये दोन पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. तर हा कारनामा करणारी ती दुसरीच भारतीय खेळाडू ठरली आहे. यापूर्वी तिने रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते.
कांस्य पदकसाठी झालेल्या या सामन्यात पहिल्या सेटमध्ये सिंधूने सुरुवातीपासूनच दमदार प्रदर्शन केले.तिने सुरुवातीला ४-१ आघाडी घेतल्यानंतर पुन्हा एकदा ६-५ने बिंगजियाओला मागे टाकले. तसेच पुढे तिने बिंगजियाओला क्रॉस शॉट खेळत ११-८ ने पहिला हाफ आपल्या नावे केला. पुढे तिने अशीच दमदार खेळी करत पहिला सेट २१-१३ ने आपल्या नावावर केला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्येही सिंधूने दबदबा कायम राखला आणि हा सेट २१-१५ अशा फरकाने जिंकला.
टोकियो २०२० ऑलिंपिक ६ ची मानांकित सिंधू आणि ८ वी मानांकित बिंगजियाओ मध्ये आजचा सामना सोडला, तर आतापर्यंत एकूण १५ सामने झाले आहेत. यामध्ये चीनची बिंगजियाओ ९-६ ने पुढे आहे. मात्र, २०१९ मध्ये झालेल्या शेवटच्या सामन्यात सिंधूने बिंगजियाओला पराभूत करत जागतिक चॅम्पियनशीपचा अंतिम सामना देखील जिंकला होता.
सुशील कुमारने जिंकले होते दोन पदक
विशेष म्हणजे यापूर्वी भारतीय कुस्तीपटू सुशील कुमारने ऑलिंपिकमध्ये दोन पदक जिंकली होती. २००८ बीजिंग ऑलिम्पिक मध्ये ६६ किलो वजन गटात फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत त्याने कांस्य पदक जिंकले होते. त्यानंतर २०१२ लंडन ऑलिंपिक्स मध्ये सुशील कुमारने रौप्य पदक जिंकले होते. टोकियो २०२० ऑलिंपिक ६ ची मानांकित सिंधू आणि ८ वी मानांकित बिंगजियाओमध्ये आजचा सामना सोडला, तर आतापर्यंत एकूण १५ सामने झाले आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी केलं कौतूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिक्स 2020 मध्ये बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल पी.व्ही. सिंधुचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान म्हणाले, सिंधु भारताचा गौरव असून आपल्या सर्वोत्तम ऑलिम्पिक खेळाडूंपैकी एक आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"पी.व्ही.सिंधुच्या कामगिरीने आपण सर्वजण आनंदी झालो आहोत. टोकियो ऑलिम्पिक्स 2020 मध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. ती भारताचा गौरव असून आपल्या सर्वोत्तम ऑलिम्पिक खेळाडूंपैकी एक आहे".
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा