ॲड.नीलिमा शिंगणे-जगड
अकोला दि २९ : काल पासून समाज माध्यमातून विशेषतः व्हाट्सएपवर एका बातमीचे कात्रण प्रचंड व्हायरल होत आहे. नागरिकही कोणतीही शहनिशा न करता एकमेकांना हे कात्रण फोर्डवर्ड करीत आहेत. 'सोमवार पासून पुन्हा कडक निर्बंध' असा या बातमीचा मथळा आहे. भारतीय अलंकार न्यूज 24 ने याबाबत शहनिशा केली असता, असा कोणताही नवा आदेश राज्य वा जिल्हा पातळीवर निघालेला नाही, यामुळे नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये. ही केवळ अफवा असून कुणीतरी उचापती वृत्तीच्या नागरिकाने खोडसाळपणा केला असल्याचे स्पष्ट होत आहे.
कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने रुग्ण उपचार संबंधाने राज्य सरकार कडून युध्द पात़ळीवर उपाय योजना केल्या जात आहे. मात्र ३ ऑगस्ट रोजी ११ जिल्हे वगळता उर्वरित २५ जिल्ह्यातील हटविण्यात आलेल्या कडक निर्बंधात कोणताही बदल झालेला नाही अथवा करण्यात आलेला नाही.
यामधे अकोला जिल्ह्याचा देखील समावेश असुन, समाज माध्यमांवर काल पासुन व्हायरल होत असलेली बातमी पूर्णतः खोडसाळ आहे. या वृत्त कात्रण वर कोणत्याही वृत्तपत्रचे नाव नाही,दिनांक नाही. पान क्रमांक नाही. विशेष म्हणजे हे फिरत असलेले वृत्तपत्राचे कात्रण ऑगस्ट महिन्यापुर्वीचे आहे. राज्यशासनाने नविन कुठलाही आदेश जारी केला नाही आणि सप्टेंबर महिन्याच्या अनुषंगाने ही जिल्हा पातळीवर ३१ ऑगस्टला जिल्हाधिकारी बैठक घेवुन ‘जो काय निर्णय घेणार’ त्यानंतरच आदेश जारी होईल. समाज माध्यमातून फिरत असलेली बातमी निराधार असल्याने कोणीही विश्वास ठेवू नये.
या खोडसाळ बातमीमुळे व्यापारी वर्गा सह सामान्य नागरिक संभ्रमात पडला आहे. सध्य स्थितीत, सर्व व्यवसायी प्रतिष्ठानाना दिलेला अवधि ‘जैसे थे’ आहे. यात कोणताही आद्यप तरी बदल झालेला नाही. केरळ व महाराष्ट्रात करोना रुग्ण संख्या वाढत असली तरी महाराष्ट्रातील परिस्थिति पुर्णपणे नियंत्रणात आहे. कडक निर्बंध शिथिल करताना ३ ऑगस्ट रोजी ज्या ११ जिल्ह्यात निर्बंध कायम ठेवले होते.यापैकी पुणे व कोल्हापुर येथील निर्बंध ही शिथिल केले आहे. मात्र केंद्र सरकारने आगामी का़ळात सण-उत्सवाने होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी कठोर उपाय योजना करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले आहे. या बाबत मुख्यंमत्री सर्व संबंधितांची बैठक घेवून नविन निर्देश देवू शकतात. परंतू, अद्याप तरी कोणताच नवीन आदेश जारी केलेला नाही. नागरिकांनी अधिकृत आदेश निघेपर्यंत अश्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा