Shivshankar Patil: कर्मयोगी श्री शिवशंकर भाऊ पाटील यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू; भाविकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये




अकोला: मॅनेजमेंट गुरू अशी जगभर ख्याती प्राप्त संत श्री गजानन महाराज संस्थान शेगावचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. वैद्यकीय तज्ञांनी तपासणी केली असता, त्यांच्या नाडीचे ठोके अद्याप सुरू असल्याचे सांगितले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.




तीन दिवसापासून शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती मल्टीऑर्गन फेलीयुअरमुळे गंभीर झालेली आहे. डॉक्टर हरीश सराफ यांच्या मार्गदर्शनात भाऊंच्या सांगण्यानुसार त्यांचे घरीच वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सध्या त्यांचा रक्तदाब कमी झालेला असून, कृत्रिम ऑक्सिजन लावण्यात आलेला आहे. आयुर्वेदतज्ञ डॉक्टर गजानन पडघन हे देखील सेवेत हजर आहेत, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे




अफवांवर विश्वास ठेवू नये; भाविकांनी पॅनिक होवू नये


संत श्री गजानन महाराज शेगाव संस्थानचे आधारस्तंभ शिवशंकर पाटील यांचे निधन झाल्याचा संदेश आज सकाळ पासून सोशल मीडियावर पसरत आहे. मात्र, हा संदेश चुकीचा असून, अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. भाविकांनी पॅनिक होवू नये, असे आवाहन त्यांच्या स्वकीयांकडून करण्यात येत आहे. 


तसेच बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याकडूनही भाविकांना अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन करण्यात आले असल्याचे कळते.




आशिष पवित्रकार यांचे आवाहन


"संत श्री गजानन महाराज यांच्या आशीर्वादाने कर्मयोगी आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आधारस्तंभ शिवशंकर भाऊ यांची तब्येत ठणठणीत असून सर्वांना विनंती आहे त्यांच्या तब्येती बाबतीत चुकीच्या अफवाह पसरवु नयेत.

भाऊंच्या कुटुंबियांशी माझे बोलणे झाले असून, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा भाऊंसोबत असल्यामुळे त्यांना आणखी निरोगी आणि उदंड आयुष्य लाभणार आहे तरीही कुठलीही शहानिशा न करता अश्या चुकीच्या बातम्यांना हवा देऊ नये. चुकीचे संदेश पसरवू नये. ही आपल्याकडून अपेक्षा."

  

आशिष पवित्रकार 

नगरसेवक 

अकोला 



हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन


श्रद्धेय शिवशंकरभाऊ गेल्या चार महिन्यांपासून आजारी आहेत,मी गेल्या अनेक वर्षांपासून नियमाने व सतत त्यांची भेट घेत असतो आज ही सकाळी आदरणीय भाऊंची भेट घेतली,त्यांची प्रकृती स्थिर आहे.

श्रद्धेय शिवशंकरभाऊंच्या प्रकृतीस्वास्थाची मंगल कामना सर्वांनी करावी हि विनंती.

हर्षवर्धन सपकाळ (मा.आमदार)








टिप्पण्या