- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Shiv Sena:NCP:अकोला: ऑनलाईन सभा सोडून शिवसेना-राकाँच्या सदस्यांचा गोंधळ;शिवसेनेचे आठ तर राष्ट्रवादीचे एक नगरसेवक निलंबित
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला : मालमत्ता कराच्या थकीत रकमेवर व्याज आकारणीच्या मुद्यावरून आज महानगरपालिकाची ऑनलाइन सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती. मात्र, सभा सोडून शिवसेनेच्या सदस्यांसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी थेट महापौरांच्या दालनात दाखल होवून ऑनलाईन सभा बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यामुळे महापौर यांनी शिस्तभंगाचा ठपका ठेवत शिवसेनेचे आठ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे एक सदस्यवर निलंबनाची कारवाई केली.
कशासाठी निलंबन
शिवसेनेचे गटनेते राजेश मिश्रा यांनी ऑनलाइन सभा बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यामुळे महापौर अर्चना मसने यांनी शिवसेना गटनेते राजेश मिश्रासह नगरसेवक मंगेश काळे,शशी चोपडे, गजानन चव्हाण, मंजुषा शेळके, प्रमिला गीते,सपना नवले आणि नगरसेविका सौ.मिश्रा व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रहीम पेंटर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. महानगरपालिकेची ही सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वीच हा गोंधळ झाला.
असा झाला घटनाक्रम
अकोला महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी सकाळी ११.३० वाजता बोलावली केली होती. ही सभा ऑनलाइन होती. मात्र, शिवसेनेच्या सदस्यांनी थेट बैठक सुरू असलेल्या दालनात धडक दिली. यापूर्वीच्या सभेत मालमत्ता करावरील व्याज आकारणीला तीन महिन्यांची स्थगिती देण्याचा ठराव घेण्यात आला असताना केवळ एक महिन्याची सक्ती माफ का केली, असा सवाल उपस्थित करून शिवसेना गट नेते राजेश मिश्रा यांनी सभा सुरू होण्यापूर्वीच सभेचे कामकाज रोखून ठेवले.
उपायुक्त वैभव आवारे यांना उत्तर देण्याचा अधिकार नसल्याने प्रभारी आयुक्त निमा अरोरा यांना बोलविण्यात आले. यानंतर एक तास नंतर अरोरा सभागृहात दाखल झाल्या. परंतू, शिवसेना गटनेते यांच्यासह सर्व शिवसेना नगरसेवकांनी सभागृहात शास्तीच्या विषयावरून सभा सुरू करण्यास विरोध दर्शविला.मात्र,अरोरा या त्यांच्या मतावर ठाम राहिल्याने राजेश मिश्रा यांनी महापौर व आयुक्तांच्या पुढील कॅमेरा बंद केला. या कारणामुळे महापौर यांनी तात्काळ राजेश मिश्रा यांच्यासह शिवसेनेच्या अन्य नगरसेवकांना एका सभेसाठी निलंबित करण्याचा आदेश दिला. शिवसेनेच्या नगरसेवकांसोबत राष्ट्रवादीचे रहीम पेंटर देखील सभागृहात उपस्थित होते. त्यामुळे त्यांना सुध्दा महापौर अर्चना मसने यांनी निलंबित केले.
नेमका कशासाठी हा गोंधळ
महत्त्वपूर्ण अधिकार्यांच्या गैरहजेरीमुळे आज अकोला महापालिकेची सभा सुमारे अर्धातास उलटूनही सुरु झाली नव्हती. सभेसाठी महापालिकेचे पन्नास पेक्षा अधिक नगरसेवक उपस्थित होते. मात्र महापालिकेचे एकही वरिष्ठ अधिकारी सभेसाठी उपस्थित झाले नव्हते. सकाळी 11.30 वाजता ही सभा आयोजित केली होती. बारा वाजून गेल्यानंतरही महासभा सुरू झाली नाही. यानंतर महापौर अर्चना मसने यांनी विषयांचे वाचन करीत महासभेला सुरुवात केली. मात्र विरोधी पक्षातील नगरसेवकांनी प्रशासनाचे एक ही अधिकारी उपस्थित नाही म्हणून ही सभा कशी काय सुरु झाली, असा सवाल उपस्थित केला. नगरसेवक इब्राहिम पेंटर यांनी याविषयी तीव्र आक्षेप घेतला. नगर सचिव अनिल बिडवे यांनी वरिष्ठ अधिकारी सभेला येत असल्याचे वारंवार सांगून परिस्थिती हाताळण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित नगरसेवकांनी या प्रकार बाबत तीव्र रोष व्यक्त केला. शिवसेना नगरसेवक गजानन चव्हाण यांनी किती वाजता मिटिंग सुरु होणार आहे अशी विचारणा केली. दरम्यान, महापौर अर्चना मसने यांनी पाच दिवसांच्या आत दलितेत्तेर निधी व महापालिका निधी अंतर्गत प्रस्ताव देण्यात येत आहे. तसेच
अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेत काम बदल करायचे असेल तर नगरसेवक काम करु शकतील, असे सांगत ठरावांची मागणी केली.
मात्र, दुपारी 12 वाजेपर्यंत प्रशासनाचे एकही बडे अधिकारी सभेत आलेले नव्हते. कोरम पुर्ण झाला असूनही प्रशासनाचे अधिकारी अनुपस्थित होते. यामुळे इब्राहिम पेंटर यांनी ही सभा स्थगित करावी, अशी मागणी केली. तर नगरसेवक गजानन चव्हाण यांनी ही मागणी रेटून धरली. दरम्यान, 12 वाजता नंतर वैभव आवारे यांनी सभेत उपस्थित झाले.
याच दरम्यान, शिवसेनेच्या नगरसेवकांनी मालमत्ता कराच्या मुद्यावर आंदोलनात्मक पावित्रा घेतला. दरम्यान उपायुक्त वैभव आवारे दहा मिनिटातच सभा सोडून दालनाबाहेर निघुन गेले. तर यावेळी ऑनलाईन उपस्थित असलेले पन्नास नगरसेवक प्रत्यक्षात सभेस्थळी काय सुरु आहे, याविषयी विचारणा करत राहिले. ऑनलाईन उपस्थित असलेल्या सदस्यांना काहीच कळत नव्हते.यानंतर घडलेल्या घडामोडीनंतर निलंबनाच्या कारवाई नंतर सभा बरखास्त करण्यात आली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा