Resource Organization: Akola: 'रिसोर्स ऑर्गनायझेशन' च्या बैठकीत बालसमस्यांवर उहापोह; 'चाईल्ड लाईन'चे कार्य वाखाणण्याजोगे : स्वरूप बोस


Discussion on child issues in the meeting of 'Resource Organization'; the work of 'Child Line' is commendable: Swaroop Bose




अकोला: गेल्या अनेक वर्षांपासून सुगत वाघमारे यांच्या नेतृत्वात सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या 'तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी' अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या 'सिटी चाईल्ड लाईन' आणि 'रेल्वे चाईल्ड लाईन' या दोन्ही संस्थांचे बालकांच्या क्षेत्रातील कार्य खरोखरीच वाखाणण्याजोगे असल्याचे गौरवोद‍्गार जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, अकोलाचे सदस्य स्वरूप बोस यांनी काढले. येथील सम्यक संबोधी सभागृहात आयोजित 'रिसोर्स ऑर्गनायझेशन'च्या बैठकीत बालसमस्यांवर उहापोह करण्यात आला, त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.  




याप्रसंगी बाल न्याय मंडळाचे सदस्य अॅड. संजय सेंगर तसेच अॅड. अनिता गुरव, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, बाल कल्याण समिती सदस्य अॅड. सुनिता कपिले, प्रीति पळसपगार, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, चाईल्ड लाईनचे संचालक विष्णुदास मोंडोकार, उत्कर्ष शिशुगृहाच्या समुपदेशिका प्रीति दांदळे, गायत्री बालिकाश्रमाच्या समुपदेशिका भाग्यश्री घाटे, सर्वोपचार रुग्णालयातील समाज सेवा अधीक्षक लक्ष्मण शिंगोटे आणि शासकीय निरीक्षण गृहाचे शिक्षक के.डी. घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.




सिटी चाईल्ड लाईन आणि रेल्वे चाईल्ड लाईन या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून अकोला जिल्ह्याच्या कानाकोप-यातील विधी संघर्ष बालकांसोबतच विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या बालकांना मोठा आधार मिळाला असून, यापुढेही या संस्था सुगत वाघमारे यांच्या मार्गदर्शनात अशाच प्रकारे उत्तमरित्या कार्य करत राहतील, त्यांना जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सदोदित सहकार्य राहील, असे आश्वासनही यावेळी स्वरूप बोस यांनी दिले. 




बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, की बालकांच्या अनेक गंभीर समस्या समोर आल्या आहेत, त्यांच्या निराकरणासाठी आम्हीही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी समितीचा कस लागत आहे. समस्याग्रस्त मुलांना त्यांचे निरागस, निकोप बालपण पुन्हा मिळवून देणे साधी बाब नाही, परंतु कामाप्रती संवेदनशीलता, तळमळ, कार्यतत्परता कायम ठेवीत हा गाडा आम्ही हाकीत आहोत त्याचप्रमाणे सिटी चाईल्ड लाईन आणि रेल्वे चाईल्ड लाईन या दोन्ही संस्थांचे बालकांच्या क्षेत्रातील कार्य चरम सीमेवर पोहोचले आहे, सोशल मिडीयाच्या वापरामुळे बालकांच्या समस्यांमध्ये भर पडली आहे त्यामुळे आगामी काळ आव्हानात्मक असणार आहे, त्यासाठी त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यास आम्ही तत्पर आहोत, अशी ग्वाहीही कुलकर्णी यांनी यावेळी दिली. 




डॉ. आरती कुलवाल यांनी जिल्हा स्त्री रूग्णालयात महिला व बालकांवर एकाच छताखाली करण्यात येत असलेल्या उपचारांची माहिती यावेळी दिली.  चाईल्ड लाईन सदस्य विक्रांत बन्सोड, साथ सेवा फाउंडेशनचे मूर्तिजापूर प्रतिनिधी अक्षय राऊत, स्व. दादासाहेब दिवेकर प्राथमिक शाळेच्या शिक्षिका प्रतिभा शिरभाते यांनीही यावेळी आपले विचार मांडले. 




याप्रसंगी आर. के. देशमुख, रवी सावळे, राजेश मनवर, विद्या उंबरकर, उमेश शिरसाट, सूदन डोंगरे, शरयू तळेगावकर, शिवानी थावरे, भावना डोंगरे, अनिकेत गवई, अनुप वाकोडे, श्वेता शिरसाट आदिंची उपस्थिती होती. रेल्वे चाइल्ड लाइन समन्वयक पद‍्माकर सदांशिव यांनी प्रास्ताविक केले. चाईल्ड लाईनच्या समन्वयिका हर्षाली गजभिये यांनी संचालन व आभार प्रदर्शन केले.


टिप्पण्या