Raksha Bandhan 2021: यंदाचा रक्षाबंधन आहे खास; 474 वर्षानंतर आलाय विशेष योग, भावाला राखी बांधण्याची शुभ वेळ जाणून घ्या


Raksha Bandhan 2021: This year's Raksha Bandhan is special;  A special yoga has come after 474 years, know the auspicious time to tie rakhi to brother (file photo)





ॲड. नीलिमा शिंगणे-जगड


अकोला: रक्षाबंधन हा भारतीय सण भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. याला राखी पौर्णिमा अथवा नारळी पौर्णिमा असे देखील म्हणतात. यावर्षीचा रक्षाबंधन अनेक शुभ योगायोग घेवून आला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या संयोगांना अतिशय शुभ मानले जाते. हे योग भाऊ आणि बहिणीसाठी तर शुभ सिद्ध होतीलच तसेच आर्थिक स्थिती सुधारण्यासही लाभदायक असल्याचे म्हंटल्या जात आहे. यावर्षी रक्षाबंधन रविवार, 22 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. यावेळी, भद्रा काळ नसल्यामुळे दिवसभर कोणत्याही वेळी राखी बांधता येणार आहे, हेच यावर्षीचे खास आहे.



पुरोहित संघाने सुनिश्चित केलेले मुहूर्त


अकोला (विदर्भ) येथील खोलेश्वर स्थित भोलेश्वर मंदिरात विविध सामाजिक प्रथा अनुसार पुरोहित संघाने बैठक घेवून रक्षाबंधन पौर्णिमाचे विविध मुहूर्त सुनिश्चित केले आहे.


असे आहेत मुहूर्त


सुन मांडणे : दिनांक 21 ऑगस्ट शनिवार रोजी आपल्या घराचे मुख्य  द्वारा वर चूना व गेरूने आपल्या कुळ परंपरा अनुसार देवी देवताचे चित्र मांडून रक्षाबंधनची शुरुआत करावी. 


यासाठी मुहूर्त असा राहिल 

शुभ प्रातः 07: 39 पासून 09: 15 पर्यंत , चर लाभ अमृत हा मुहूर्त राहिल दुपारी 12: 25 पासून सायन 05: 11 पर्यंत.



राखी बांधणे : 

यंदा नारळी पूर्णिमा रक्षाबंधन 22 ऑगस्ट रविवारला आहे. भद्रा प्रातः 06: 12 वाजता समाप्त होत आहे. 



देवी देवताला नैवेद्य लावणे एवं राखी  बांधने हे श्रेष्ठ मुहूर्त राहिल 


प्रातः चर 07: 3 9 ते 09: 15 पर्यंत

लाभ प्रातः 09: 15 पासून 10: 50 पर्यंत

अमृत प्रातः 10: 50 ते 12: 25 वाजे पर्यंत.


शुभ मुहूर्त - 


दुपारी 01: 59 ते 03: 35 पर्यंत


अभिजीत मुहूर्त - 


11: 59 पासून 12: 47 दुपारी पर्यंत राहिल. 



सभा सर्वश्री पंडित रमेश अडीचवाल, राजू सुरोलिया, भैरू शर्मा, श्यामसुंदर अवस्थी, पंडित रवि कुमार शर्मा यांच्या उपस्थित संपन्न झाली.




दुर्लभ योग


ज्योतिषचार्य यांच्या म्हणण्यानुसार यंदा  रक्षाबंधनला ग्रहांचा दुर्लभ संयोग 474 वर्षानंतर जुळून आला आहे. याआधी  11 ऑगस्ट 1547 रोजी हा योग आला होता. गजकेसरी योग बहीण भावाच्या अतूट नात्यासाठी अत्यंत लाभकारक असल्याचे मानले जाते तर नवीन खरेदीसाठी राजयोग असल्याचे म्हंटले जात आहे.




रक्षाबंधनाच्या लोकप्रिय कथा 

 

पौराणिक कथा: माता लक्ष्मी व राजा बळी


रक्षाबंधनाशी संबंधित अनेक कथा शास्त्रात सांगितल्या आहेत. मात्र, यापैकी राजा बळी आणि माता लक्ष्मीची पौराणिक कथा लोकप्रिय आहे. धार्मिक कथांनुसार, माता लक्ष्मीने राजा बळी यांना राखी बांधली होती. एकदा देवतांना राजा बळीने कैद केले होते. राजा बळीने आपली बहीण माता लक्ष्मीला अर्पण म्हणून देवतांना मुक्त करण्याचे वचन दिले होते. मात्र, राजा बळीने सुद्धा देवतांना मुक्त करण्यासाठी एक अट घातली होती. ती अट अशी होती की, वर्षातील चार महिने देवतांना अशाच प्रकारे कैदेत राहावे लागेल. म्हणूनच आषाढ शुक्ल पक्षाच्या देवशयनी एकादशीपासून कार्तिक शुक्ल पक्षाच्या देवउठनी एकादशीपर्यंत चार महिने सर्व देवता पाताळात राहतात. या काळात मंगलकार्य करण्यास मनाई आहे.



चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला


भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी माता यांची कथा देखील बालपणापासून भारतीय ऐकतात. वाचतात. संकटकाळी माता द्रौपदीचे रक्षण श्रीहरीने केले होते. कारण कधीकाळी द्रौपदीने श्रीकृष्ण यांच्या जखमी बोटावर आपले भरजरी वस्त्र शेला फाडून त्याची चिंधी करून बांधली होती. यावेळी भगवान श्रीकृष्ण यांनी माता द्रौपदी यांना रक्षण करण्याचे वचन दिले होते.



चितोडची महाराणी कर्णावती व सम्राट हुमायून


मध्ययुगीन काळात राजपूत आणि मुघलांमध्ये संघर्ष चालू होता. अशा स्थितीत गुजरातच्या सुलतान बहादूर शाहने चितोडवर हल्ला केला होता. राजपूत आणि मुघल यांच्यातील संघर्षामुळे महाराणी कर्णावती (चित्तूरच्या महाराजाची विधवा पत्नी) मुघल सम्राट हुमायूनला स्वतःसाठी आणि प्रजेसाठी संरक्षण देत राखी पाठवली होती. मग हुमायूनने राणी कर्णावतीचा प्रस्ताव स्वीकारला, त्याच्या बहिणीला संरक्षण दिले आणि तिच्या राखीचा आदर केला, अशी कथा प्रसिद्ध आहे. 


रक्षाबंधनला आले गिफ्टचे महत्व


अलीकडच्या काळात रक्षाबंधन निम्मित बहीण भाऊ यांच्यात भेटवस्तू घेण्या-देण्या वरून चढाओढ लागलेली असते. हीच बाब व्यापारी व व्यावसायिकानी हेरली आहे. बाजारपेठ मध्ये वैविध्यपूर्ण राखी सोबतच भेटवस्तू देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या असतात. कोरोनाच्या संकट काळात ऑनलाईन शॉपिंग अँप्लिकेशनने तर स्पेशल रक्षाबंधन स्टोर सुरू केले आहेत. ऍमेझॉन, फिल्पकार्ट, स्नॅपडील, ट्राईब्ज इंडिया आदी शॉपिंग अँप्लिकेशनने विविध राखी सोबत भेटवस्तूंची शृंखला उपलब्ध केली आहे. साडी, सलवार सूट, मोबाइल, टीव्ही, वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट, क्रोकरी असे सर्व काही यात आहे. बचतीच्या ऑफर्स देखील उपलब्ध केल्या आहेत.



       ************************


रक्षाबंधन के विविध मुहूर्त: मुहूर्त को लेकर पुरोहित संघ की सभा संपन्न


अकोला: इस बार रक्षाबंधन रविवार 22 अगस्त को आ रही है, रक्षाबंधन पर समाज में अलग-अलग प्रकार की लोक प्रथा है, इसी आधार पर रक्षाबंधन इसके पूर्व किए जाने वाले सामाजिक आध्यात्मिक लौकिक व्यवहार को ध्यान में रखते हुए अकोला पुरोहित संघ द्वारा खोलेश्वर स्थित श्री भोलेश्वर मंदिर में सभा का आयोजन कर विविध प्रकार के मुहूर्त निश्चित किए गए.



सून मांडना : शनिवार 21 अगस्त को भद्रा सायं काल  7:00 बजे लग रही है, सून मांडने के लिए  सारा दिन शुभ है. यह विधि चूना और गेरू से संपन्न होती है. ज्यादातर घरों में घर के द्वार पर यह विधि नेवगी (नाई) समाज संपन्न करते हैं. सुबह शुभ मुहूर्त में 7: 39 से 9:15 तक, चर लाभ अमृत में दोपहर 12:25 से शाम 5:11 बजे तक यह विधि संपन्न की जा सकती है.



राखी बांधना -: एवं सून जिमाना भोग लगाना, राखी बांधना यह दोनों मुहूर्त रहेंगे रविवार 22 अगस्त को, भद्रा सुबह 06: 12 तक रहेगी. सुबह चर मैं 07: 39 से 9:15 तक,


लाभ में सुबह 9:15 से 10:50 बजे तक

अमृत में सुबह 10:50 से 12:25 बजे तक

शुभ में दोपहर 1:59 से 3:35 तक.



अभिजीत मुहूर्त -: 11: 59  से 1247 तक

पूर्णिमा तिथि रहेंगे शाम 5:31 तक अतः आप ऊपर दिए मुहूर्त में राखी  बांध सकते हैं.


सभा में सर्वश्री रमेश आडीचवाल , राजू सुरोलिया, भैरू शर्मा, श्यामसुंदर अवस्थी, एवं पंडित रवि कुमार शर्मा उपस्थित थे.




टिप्पण्या