protest:government:Teachers Day 2021: विदर्भ मुख्याध्यापक संघ काळ्या फिती लावून शिक्षक दिनी करणार शासनाचा निषेध; काय आहेत मागण्या जाणून घ्या

Vidarbha headmasters 'union will protest the government on Teachers' Day with black ribbons

 




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: विदर्भ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची सभा 3 ऑगस्ट रोजी झाली. विदर्भ मुख्याध्यापक संघ काळ्या फिती लावून शिक्षक दिनी शासनाचा निषेध करणार असल्याचा एकमुखी निर्णय या सभेत घेण्यात आला असल्याची माहिती भारतीय अलंकार 24 सोबत संवाद साधताना अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड यांनी दिली.



काय आहेत मुख्य मागण्या


मुख्याध्यापक संघाने प्रलंबीत बाबींची शासनाकडे वारंवार मागणी आतापर्यंत केली आहे. 


*मुख्याध्यापक संघाच्या विविध मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात, 

*शिक्षक भरती सुरू करावी, 

*कनिष्ठ महाविद्यालय मधील अघोषित शाळाची यादी घोषित करावी, 

*२००५ पूर्वी नियुक्त कर्मचा-यांना प्राव्हीडंट फंड खाते उघडून सातव्या वेतन आयोगाचा पहीला हप्ता जमा करण्यात यावा, 

*२०१३ - १४ मध्ये नैसर्गिक वाढीच्या तुकडयांना प्रचलित नियमा प्रमाणे अनुदान द्यावे,  

*विद्यार्थांचे लसीकरण करून शहरी भागातील शाळा सुरु कराव्यात, 

*संच मान्यता, 

*निकष पूर्ण करणाऱ्या शाळांना अनुदान,

*वेतनेतर अनुदान, 

*जुन्या पेन्शन योजना, 

*पाठ्य  पुस्तके त्वरीत मिळावी, 

*सेवानिवृत्त मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरण सातव्या वेतन आयोगानुसार अदा करण्यासाठी शिक्षण विभागाने आदेश काढावा, 

*शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पद भरतीस मान्यता द्यावी, 

*राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित करावे. 



विदर्भ मुख्याध्यापक संघ यांनी जिल्हा स्तरावर शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी काळ्या फिती लावून तालुका स्तरावर निवेदन दयावे, असे आवाहन बैठकीत  विदर्भ अध्यक्ष शत्रुघ्न बिरकर यांनी केले. बैठकीत जिल्हानिहाय प्रश्न समजून त्यावर चर्चा करण्यात आली.




सभेला राज्यअध्यक्ष मारोतराव खेडीकर, विदर्भअध्यक्ष शत्रुघ्न बिडकर, कार्याध्यक्ष अशोक पारधी, विदर्भ उपाध्यक्ष तथा बुलडाणा जिल्हा अध्यक्ष विलासराव भारसाकळे, रामसागर धावडे, मंदा उमाठे, सचिव सतिश जगताप, ज्येष्ठ मार्गदर्शक नरेंद्रचंद्र वाळके, नागपूरचे सचिव मधुसूदन मुळे, अकोला अध्यक्ष  बळीराम झामरे, प्रकाश भूमकाळे अध्यक्ष यवतमाळ, गोंदिया अध्यक्ष रमेश तनवानी, भुपेन्द्र त्रिपाठी, रजीया बेग आदी प्रामुख्याने उपस्थित होते.




सभेचे संचालन सतिश जगताप यांनी केले.  आभार विलास भारसाकळे यांनी मानले.

टिप्पण्या