nutritious food of the players: खेळाडूंच्या पौष्टिक आहारासाठी पालकमंत्री बच्चू कडू देणार स्वतःच्या मानधनातील 2 लाख रुपये देणार..

Guardian Minister Bachchu Kadu will give Rs 2 lakh from his own honorarium for the nutritious food of the players.




अकोला: खेळाडूंनी अधिकृत क्रीडा संघटनांच्या मार्फतच खेळाडूंनी स्पर्धात सहभाग घ्यावा, त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्कात रहावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी खेळाडूंना केले. तसेच तालुका क्रीडा संकुलांचा वापर अधिकाअधिक प्रमाणात कसा करता येईल, यासाठी धोरण आखण्यात यावे, असेही निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज दिले तसेच गरीब खेळाडूंच्या पौष्टिक आहारासाठी आपल्या मानधनातील दोन लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली.



खेळाडूंनी सांगितल्या अडचणी

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात गुणवत्ताधारक खेळाडूंशी ना.कडू यांनी 15 ऑगस्ट रोजी हितगुज केले. गुणवत्ताधारक खेळाडुच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज ना.कडू यांनी बैठक बोलावली होती. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, उप जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे आदी उपस्थित होते. यावेळी खेळाडूंनी आपल्याला येत असलेल्या अडचणींची माहिती पालकमंत्र्यांना दिली. यात खेळाची साधने, आवश्यक आहार, वरिष्ठ पातळीवर खेळावयास जाण्यासाठी लागणारे आर्थिक सहाय्य इ.प्रकारच्या अडचणींची माहिती देण्यात आली.



खेळाडूंनी अधिकृत संघटनेकडून खेळावे

यावेळी खेळाडूंनी अधिकृत क्रीडा संघटनांच्या मार्फतच खेळाडूंनी स्पर्धात सहभाग घ्यावा, त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्कात रहावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी खेळाडूंना केले.तसेच तालुका क्रीडा संकुलांचा वापर अधिकाअधिक प्रमाणात कसा करता येईल, यासाठी धोरण आखण्यात यावे, असेही निर्देश ना.कडू यांनी दिले.

टिप्पण्या