Narayan Rane:Akola:bjp: शिवसेनेला जश्यास तसे उत्तर देवू; पोलिसांवर दबावतंत्र वापरून राज्य सरकार करताहे सर्व कृत्य - चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

BJP aggressive: We will answer Shiv Sena as it is;  The state government is doing everything by using pressure on the police - Chandrasekhar Bavankule alleges




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या नंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसैनिकांनी भाजप कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर आणि नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून, राज्यभर निषेध नोंदविण्यात आला. अकोल्यात देखील मंगळवारी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपने आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. 



शिवसेनेने जर आता भाजप कार्यालयात जावून तोडफोड केली तर भाजप सुद्धा त्यांना त्याच भाषेत उत्तर देणार असल्याचे यावेळी बावनकुळे म्हणाले. तर पोलिसांवर दबावतंत्र वापरून राज्य सरकार सर्व कृत्य करत असल्याचा आरोप देखील बावनकुळे यांनी केला आहे.





केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्याचे राजकिय वातावरण तापले आहे. राज्यात अनेक ठिकाणी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने उभे ठाकल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अवघ्या राज्यात प्रत्येक शहरात शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या विरुद्ध विविध पध्दतीने आंदोलन केली.  काही ठिकाणी शिवसैनिकांनी भाजप कार्यालयाची तोडफोडही केली. या विरोधात आता भाजपने सुद्धा दण्ड थोपटले आहे. भाजपने नारायण राणे यांच्या अटकेनंतर राज्यभर निषेध नोंदविला आहे. 


जन आशीर्वाद यात्रा आंदोलनात बदलली

माजी राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जन जन आशीर्वाद यात्रे निम्मित अकोल्यात आले आहेत. काल दिवसभर नारायण राणे यांच्या अटकेची नाट्यमय घडामोडी नंतर जनसंवाद यात्रा आंदोलनात बदलली. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना विरोधात घोषणा बाजी केली.


महाविकास आघाडीचा भेदभाव आणि केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांना अटक केल्याच्या विरोधात जयप्रकाश नारायण चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह जवळ मंगळवारी सायंकाळी भाजपने हे आंदोलन केले. सरकारच्या एक तर्फी कारवाईच्या विरोधात व  भाजपा कार्यालयाची तोडफोड करण्याऱ्या असामाजिक तत्त्वांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनात करण्यात आली. 



आंदोलनात आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल आदी सह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टिप्पण्या