Narayan Rane: नारायण राणे यांना महाड न्यायालयाचा दिलासा:जामीन मंजूर; जन आशीर्वाद यात्रेत आता राणे काय उत्तर देणार?

Mahad court grants relief to Narayan Rane: Bail granted;  What will Rane answer now in Jan Ashirwad Yatra?






महाड: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी न्यायालयाने फेटाळून लावला होता. तर उच्च न्यायालयाने अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. मात्र त्यानंतर राणे यांनी महाड न्यायालयात धाव घेतली. महाड न्यायालयाने राणे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केल्याने तूर्तास राणे यांच्यावरील अटकेची कारवाई टळली आहे. जामीन मिळाल्यानंतर मंगळवारी रात्री साडे बारा वाजताच्या दरम्यान राणे यांनी 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले.



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले म्हणून राणे यांना अटक करण्यात आली होती. रत्नागिरी न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आणि उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी नारायण राणे यांना अटक केली होती. 



पोलिसांनी राणे यांच्या विरुद्ध महाड येथे गुन्हा दाखल असल्याने,रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना महाड पोलिसांच्या ताब्यात दिले होते. यानंतर राणे यांना महाड न्यायालयात हजर केले. महाडच्या न्यायालयात बराच वेळ नारायण राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. पोलिसांनी राणे यांना सात दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती. पण राणे यांच्या वकिलांनी संयुक्तिक युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने राणे यांना जामीन मंजूर केला.त्यामुळे मंगळवारची रात्र जेलमध्ये काढण्याची राणे यांच्यावरही वेळ टळली. दरम्यान, राणे यांचे प्रकृती स्वास्थ्य बिघडली होते.



राणे यांना आता जामीन मंजूर झाल्याने आज जन आशीर्वाद यात्रा सुरु राहील, असे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे जन आशीर्वाद यात्रेत संबोधित करताना पुढे राणे काय उत्तर देतात,याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.




टिप्पण्या