Narayan Rane: politics: Shivsena: महाराष्ट्राचे राजकारण तापले: अकोल्यात संतप्त शिवसैनिकांनी नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याची काढली धिंड

Maharashtra politics heats up: Angry Shiv Sainiks remove symbolic statue of Narayan Rane in Akola




नीलिमा शिंगणे- जगड

अकोला : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपर्य वक्तव्य केल्या आरोप करीत राज्यभरात नारायण राणे यांच्या विरोधात शिवसैनिक चांगलेच तापले आहेत. अवघ्या राज्यात याचे पडसाद पडले आहे. राज्यात ठीकठिकाणी नारायण राणे यांच्या विरुद्ध पोलीस तक्रार आणि त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहेत. अकोल्यातही आज संतप्त शिवसैनिकांनी नारायण राणे यांची प्रतिमा गाढवाच्या चेहऱ्यावर लावून राणेंचा प्रतिकात्मक पुतळा गाढवावर बसवून धिंड काढली. यावेळी 'कोंबडी चोर' असे लिहलेले पोस्टर हातात घेऊन शिवसैनिक राणे यांच्या  विरोधात घोषणाबाजी करीत होते.



पुतळा जाळण्याचा प्रयत्न

नारायण राणे यांचा कोंबडी घेऊन तयार केलेला पुतळाही यावेळी शिवसैनिकांनी जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच दखल घेवून शिवसैनिकांचा हा प्रयत्न हाणून पाडला. 



वाहतुकीची कोंडी


यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये थोडी वादावादी झाली. जयहिंद चौक ते गांधी रोड पर्यंत हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.यावेळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. सामान्य जनतेला या आंदोलनामुळे नाहक त्रास सहन करावा लागला.

टिप्पण्या