Narayan Rane: BJP: Shivsena: न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला: अखेर नारायण राणे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, आता भाजप कार्यकर्ते आक्रमक

Narayan Rane: BJP: Shivsena: Court rejects pre-arrest bail plea: Narayan Rane finally arrested by police, now BJP activists aggressive





रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला असल्याने अखेर पोलिसांनी त्यांना आता ताब्यात घेतले आहे. 


दरम्यान, रत्नागिरी कोर्टाने नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर  त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र त्यांच्या अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचे एक पथक कोकणाकडे रवाना झाले होते.तसेच पुणे येथून देखील एक पथक त्यांच्या अटकेसाठी पाठविण्यात आले होते.


दरम्यान, नारायण राणे यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, रत्नागिरी न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. यानंतर पोलिसांनी नारायण राणे यांना आता ताब्यात घेतलेल आहे.




तत्पूर्वी, पोलीस अधीक्षक अटकेसाठी पोहोचले, मात्र त्यांच्याकडे अटक वॉरंट नसल्याने राणेंनी बाहेर येण्यास नकार दिला होता. आता मात्र न्यायालयाने जामीन नाकारल्याने  नारायण राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 




नारायण राणे हे त्यांच्याच गाडीतून पोलिसांबरोबर ठाण्यात रवाना झाले आहे. दरम्यान, निलेश राणे यांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र,पोलिसांनी अडवणूक केल्याने ते बाजूला झाले. 




नारायण राणे यांना ताब्यात घेतल्यानंतर आता भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. राज्यात आधी पासूनच शिवसैनिक संतप्त आहेत.आता भाजप कार्यकर्ते पेटून उठले आहेत.त्यामुळे राज्यात परिस्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 


राणे यांच्या पाठीशी भाजप सदैव राहणार


दरम्यान, अमित शहा यांनी फोन करून नारायण राणेंना त्यांच्या बरोबर असल्याचे सांगत मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी, "भाजप राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठिशी नाही पण भाजप पूर्णपणे नारायण राणेंच्या पाठिशी आहे".असे दोन्ही बाजूने बोलत संभ्रमात टाकणारे वक्तव्य केले आहे.




प्रकरणाची पार्श्वभूमी


जनआशीर्वाद यात्रे दरम्यान बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केले होते. काल रायगड मधील महाड येथे या यात्रेदरम्यान त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी  संवाद साधताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. त्यांच्या याच वक्तव्यावरुन त्यांच्या विरोधात नाशिक, पुणे महाडमध्ये तसेच अन्य ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान आज संतप्त शिवसैनिकांनी आंदोलन करून विविध पद्धतीने राणे आणि त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. 



टिप्पण्या