Khel Ratna Award:sport:India: राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून नामकरण

Rajiv Gandhi Khel Ratna Award now named as Major Dhyanchand Khel Ratna Award




नवी दिल्‍ली: आतापर्यंत राजीव गांधी खेल रत्न नावाने दिला जाणारा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आता मेजर ध्यानचंद यांच्या नावाने ओळखला जाणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नामकरणची घोषणा आपल्या ट्विटर हँडल वरून आज केली आहे.



खेल रत्न पुरस्कारांना मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याची विनंती नागरिकांकडून केली जात होती. लोक भावनांचा आदर करत खेल रत्न पुरस्काराला आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून संबोधले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घोषित केले आहे.




सर्वोच्च क्रीडा सन्मान

भारताला अभिमान आणि सन्मानाच्या नव्या शिखरावर नेणाऱ्या खेळाडूंमध्ये  मेजर ध्यानचंद हे अग्रगण्य होते. आपल्या देशाच्या सर्वोच्च क्रीडा सन्मानाला त्यांचे नाव देणे उचित होईल, असे देखील  पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.  




दरम्यान, मोदी यांनी भारतीय महिला व पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक मध्ये केलेल्या शानदार प्रदर्शनाचे कौतूक केले. महिला आणि पुरुष हॉकी संघाच्या चमकदार कामगिरीने संपूर्ण देशाचे मन जिंकले आहे. संपूर्ण देशभरात हॉकी प्रती नव्याने रुची निर्माण होत आहे. येत्या काळासाठी हे अतिशय सकारात्मक चिन्ह आहे, असे पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे.




खेल रत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याची विनंती नागरिकांकडून केली जात होती. त्यांच्या भावनांचा आदर करत खेल रत्न पुरस्काराला आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून संबोधले जाईल, असे नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे.



ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंच्या शानदार प्रयत्नाने देशाचे मन जिंकले आहे. विशेष  करून हॉकी मध्ये आपल्या मुला-मुलीनी जी इच्छाशक्ती, जिंकण्यासाठीची झुंजार वृत्ती  यांचे घडवलेले दर्शन वर्तमान आणि येत्या काळासाठी मोठी प्रेरणादायी आहे.




देशाला अभिमानास्पद अशा या क्षणी खेल रत्न पुरस्काराला आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार म्हणून संबोधले जावे अशी जन भावना व्यक्त करण्यात येत होती. या लोक भावनेचा आदर करत या पुरस्काराचे नाव आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे करण्यात येत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे.  


दरम्यान या नामकरणचे हॉकी प्रेमींकडून स्वागत होत आहे.मात्र, या नामकरणमुळे भाजप-काँग्रेस मध्ये राजकीय शीत युद्ध पेटण्याचे संकेत आहेत.





टिप्पण्या

  1. The decision to name Khelratna award as Rajiv Gandhi खेल रत्न award was taken by the Parliament. Rajiv Gandhi as PM did so many things to promote games and sports in India. To change this is really bad gesture towards the Ex PM. Instead another award can be given as ध्यान hand Award in the honour of the Legendary sportsman. This act shows just hetred towards Gandhi Nehru family.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा